Corona Live Update: धारावीत आढळला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह

coronavirus image
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईतल्या धारावी परिसरात कोरोनामुळे एका व्यक्तिचा मृत्यू झाल्यानंतर आता आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ३५ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा पेशंट वोक्हार्ट हॉस्पिटलमधील कर्मचारी आहे. तो राहत असलेला परिसर सध्या क्वारंटाइन केलेला असून अतिधोकादायक म्हणून घोषित केलेला आहे.


वसईत कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू, पालघरमधील पहिला बळी

पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका ६४ वर्षीय व्यक्तिचा कोरोनामुळे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा परदेशातील प्रवासाचा कोणताही इतिहास नव्हता. या व्यक्तिला टीबी असल्याचे देखील रुग्णालयातर्फे सांगण्यात येत आहे.


पुण्यातील ससून रुग्णालयात ४६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू. या महिलेचा आजच कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.


आज ८१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; या शहरात वाढले रुग्ण

राज्यात आज नव्याने ८१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून मुंबई ५७, अहमदनगर ९, पुणे ६, ठाणे ५, पिंपरी चिंचवड ३ आणि बुलढाण्यात १ रुग्ण आढळून आला आहे. तर एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ४२ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

 


नौदलाने बनवली टेम्परेचर गन

मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमधील कर्मचारी, अधिकारी आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तींची असलेली वर्दळ लक्षात घेऊन नौदलाने प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यासाठी आय आर प्रणालीवर आधारित टेम्परेचर गन तयार केली आहे. घरगुती साधनांचा वापर करून बनवण्यात आलेली ही गन अवघ्या एक हजार रुपयांत बनवली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या टेम्परेचर गनच्या तुलनेत ही फारच स्वस्त आहे. 285 वर्ष जुने असलेल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये तब्बल 20 हजारपेक्षा अधिक व्यक्तींची दररोज ये-जा असते. त्यामुळे आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी थर्मोमीटर किंवा टेम्परेचर गन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

 


धारावीत सफाई कामगाराला कोरोनाची लागण!

मुंबई पुन्हा एकदा सफाई कामगाराला कोरोनाची लागण झाल्याच समोर येत आहे. ५२ वर्षांचा हा कोरोना सदृश्य कामगार असून त्याला उपचार करण्याचा सल्ला दिला होता. आता त्याची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या त्याची स्थिर असून त्याला कुटुंबियासह इतर २३ सहकाऱ्यांना क्वारंटाईन करण्यास सांगितलं आहे, अशी सविस्तर माहिती महापालिकेच्या आधिकाऱ्यांनी दिली आहे.


नगरमध्ये आणखीन सहा जण कोरोन पॉझिटिव्ह आढळले आहे. ५१ रुग्णांपैकी सहा जणांचा पॉझिटिव्ह अहवाल समोर आले आहेत. त्यामुळे नगरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १४वर पोहोचली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेशी  संवाद साधला. यावेळी राज्यातील ९० टक्के लोक सरकारच्या नियमाचे पालन करत असल्याचे सांगितले. नियमाचे पालन न करणाऱ्यांना नाईलाजाने कारवाई करण्यात येईल, असं शरद पवार म्हणाले.

पोलिसांना सक्तीची भूमिका घ्यावीच लागेल – शरद पवार


कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी एनसीसीने आपल्या वेगवेगळ्या युनिटचे कॅडेट्सना तात्पुरत्या रोजगारासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.


राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत राज्यात ३३५ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. मात्र पुण्यात दोन आणि बुलढाण्यात एक नवा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्ताची संख्या ३३५ वरून ३३८वर पोहोचली आहे. बुलढाण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. आता बुलढाण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५वर तर पुण्यातील ५२वर पोहोचली आहे.


कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यासमोरील संकटामध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३३५ वर पोहोचला आहे. त्यापैकी १६ जणांचे बळी गेले आहेत. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे सध्या भीतीचे वातावरण जास्तच पसरत आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे…

१) मुंबई – १८१ – (मृत्यू १२)

२) पुणे (शहर आणि ग्रामीण भाग) – ५० – (मृत्यू १)

३)सांगली – २५

४)मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा व जिल्हे – २ (मृत्यू २ )

५)नागपूर – १६

६) अहमदनगर – ८

८) यवतमाळ – ४

८) बुलढाणा – ४ (मृत्यू १)

९) सातारा, कोल्हापूर प्रत्येकी – २

१०) औरंगाबाद, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी -१

११) इतर राज्य – गुजरात १

एकूण ३३५ (मृत्यू १६)

आतापर्यंत देशभरातील कोरोनाची आकडेवारी

महाराष्ट्र – ३३५
केरळ – २६५
तमिळनाडू – २३४
दिल्ली – १५२
राजस्थान – १२०
उत्तर प्रदेश – ११७
आंध्रप्रदेश – १११
कर्नाटक – ११०
तेलंगणा – ९७
गुजरात – ८७
मध्यप्रदेश – ८६
जम्मू-काश्मीर – ६२
पंजाब – ४६
हरयाणा – ४३
पश्चिम बंगाल – ३७
बिहार – २४
चंदीगढ – १७
आसाम – १३
लडाख – १३
अंदमान-निकोबार – १०
छत्तीसगड – ९
उत्तराखंड – ७
गोवा – ५
ओडिसा – ५
हिमाचल प्रदेश – ३
पाँड्युचेरी – ३
झारखंड – १
मनिपुर – १
मिझोरमा – १
एकूण – २०१४