घरCORONA UPDATECoronavirus Updates: देशात कोरोनाचा तांडव! पहिल्यांदाच २४ तासांत १ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची...

Coronavirus Updates: देशात कोरोनाचा तांडव! पहिल्यांदाच २४ तासांत १ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद

Subscribe

देशात पुन्हा एकदा २०२० मधील स्थिती उद्धभवली आहे. कोरोनाची दुसरी लाट जास्त वेगाने सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या भयावह लाटेच्या सामना करावा लागणार आहे. दरम्यान देशात पहिल्यांचा २४ तासांत एक लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांचा एकूण आकडा सव्वा कोटी पार गेला आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मृत्यूचा आकडा कमी झाला आहे. परंतु सक्रिय रुग्ण वेगाने वाढत आहेत, त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा ७ लाख पार झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून राज्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात आजपासून मिनी लॉकडाऊन आणि विकेंडला लॉकडाऊन असणार आहे. याबाबतची घोषणा काल (रविवार) करण्यात आली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशाची आकडेवारी जारी केली आहे. २४ तासांत १ लाखांहून अधिक रुग्ण देशभरात आढळले आहे. त्यामुळे देशातील पुन्हा एकदा कोरोनामुळे परिस्थिती भयावह होताना दिसत आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत १ लाख ३ हजार ५५८ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ४७७८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ५२ हजार ८४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी २५ लाख ८९ हजार ६७वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६५ हजार १०१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ कोटी १६ लाख ८२ हजार १३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सक्रिय रुग्णांचा आकडा ७ लाख ४१ हजार ८३०वर पोहोचला आहे. आतापर्यंत ७ कोटी ९१ लाख ५ हजार १६३ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा – आता राज्यात Mission Begin Again ऐवजी ‘Break The Chain’, वाचा नवी नियमावली


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -