घरदेश-विदेशड्रोनद्वारे फक्त ६०० रुपयांत पोहचणार वॅक्सिनच्या १० हजार कुप्या, कर्नाटकात ट्रायल सुरु

ड्रोनद्वारे फक्त ६०० रुपयांत पोहचणार वॅक्सिनच्या १० हजार कुप्या, कर्नाटकात ट्रायल सुरु

Subscribe

तेलंगणाचा प्रोजेक्ट किती वेगळा आहे?

देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरु ठेवण्यासाठी केंद्राकडून शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. यात देशात औषध आणि लसींचा पुरवठा करण्यासाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्नाटकात १८ जूनपासून १०० तासांची ट्रायल सुरु केली आहे. जवळपास १३ ड्रोन निर्मिती कंपन्यांनी या ट्रायलमध्ये सहभाग घेतला आहे. या ट्रायलचा उद्देश केवळ औषध आणि लसींचा पोहचवण्याचा नसुन भविष्यात इतर वस्तू ड्रोनच्या माध्यामातून पोहचता येतील का हे पाहणे आहे.

यात तेलंगणा सरकारनेही वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसह ‘मेडिसिंस फ्रॉम द स्काय’ प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केली आहे. यातून राज्यात आपत्कालीन परिस्थित वैद्यकीय उपकरणे आणि औषधे कशी पोहचवता येतील यासाठी योजना आखली जातेय. ही ट्रायल २१ ते २२ जूनदरम्यान होार आहे. त्याशिवाय ११ जून रोजी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) ने निविदा जारी करत देशातील दुर्गम भागात लस पोचविण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात स्काय एअर मोबिलिचीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विंग कमांडर एस. विजय यांनी अधिक माहिती दिली आहे. तर जाणून घेन ड्रोनच्या माध्यमातून वस्तू पुरवठा करण्यासंदर्भात तेलंगणा सरकार आणि आयसीएमआरमधील निविदा.

- Advertisement -

ड्रोनद्वारे वस्तू पुरवठा किती वेगवान आणि स्वस्त होईल?

ड्रोनद्वारे वस्तु पुरवठा करणे विचार करण्यास महाग वाटत असले तरी यामाध्यमातून स्वस्त आणि वेगाने वस्तू पुरवठा करता येणार आहे. ३० किमी अंतरापर्यंत ड्रोनद्वारे लस किंवा वस्तू पोहचवण्यासाठी फक्त ५०० ते ६०० रुपये खर्च लागेल. यासाठी केवळ ३० मिनिटे लागणार असून एका दिवसात एका ड्रोनच्या १५ ट्रिप्स होऊ शकतात. दरम्यान याच वस्तू रस्ते मार्गे बाईकने ठरावीक अंतरापर्यंत पोहचण्याचे झाल्यास लागणार वेळ, खर्च आणि एका व्यक्तीचा खर्च अधिक आहे. ज्या ठिकाणी नेटवर्क नाही किंवा अतिशय दुर्गम भाग अशा भागांत ड्रोनद्वारे वस्तू पोहवणे सुलभ होणार आहे. कारण अशा ठिकाणी एक व्यक्ती दोनहून अधिक घेप मारु शकत नाही. सध्या अतिश. दुर्गम भागात औषधे किंवा लस पोहचवण्यासाठी दुचाकी किंवा ट्रकाचा वापर केला जात आहे. यासाठी कर्मचारी आणि वाहनांचीही गरज लागत आहे. परंतु वाहतुक कोंडी किंवा खराब रस्त्यांमुळे या लसीची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या भागात रस्त्यांचे जाळे नाही किंवा पावसाळ्यात वाहतुकीची पर्यायी सोय नाही अशा भागांमध्ये लसीकरण मोहिमेवर प्रभाव होण्याची शक्यता आहे. याठिकाणी ड्रोनच्या मदतीने हे काम अगदी सहजपणे केले जाईल.

ड्रोनद्वारे वस्तू पुरवठा करण्याचे काही महत्वाचे नियम

आयसीएमआरने ११ जून रोज देशात कोरोना लसीच्या ड्रोनद्वारे वितरणाबद्दल निविदा काढल्या होत्या. परंतु ड्रोनद्वारे वस्तूंचे वितरण करण्यासंदर्भाती या निविदेवर बर्‍याच दिवसांपासून काम सुरू आहे. नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA)२०१९ मध्ये बियॉन्ड द व्हिज्युअल लाईन ऑफ सिविल एविएशन (BVLOS) म्हणजेच ३० ते ३५ किमी अंतरापर्यंत वस्तू वितरीत करण्यासाठी काही कंपन्यांकडे प्रस्ताव मागविला होते. यामध्ये २० कंसोर्टियम (कंपन्यांचे गट) स्वारस्य दर्शविले आहे. यापूर्वी या ड्रोन कंपनयांचे बंगलोरमध्ये प्रायोगिक ट्रायल घेण्यात येणार आहेत.

- Advertisement -

बेंगळुरूमध्ये काय सुरु आहे?

ड्रोन उ़ड्डाण हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे, म्हणून या प्रक्रियेत डीजीसीएबरोबरच गृह मंत्रालय आणि इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) देखील लक्ष देणार आहे. या ड्रोन उड्डाण प्रक्रियेतून मिलिट्री स्टेशनसारख्या संवेदनशील जागा स्वतंत्र ठेवण्यात आल्या आहेत. सर्व विभागांकडून कंपन्यांना आणि मार्गांना मंजुरी मिळाल्यानंतर १९ जूनपासून बेंगळुरूमध्ये १०० तासांचे ड्रोन उड्डाण केले जात आहे. या ट्रायलमध्ये २० ड्रोन कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. सर्व कंपन्यांची उद्दीष्टे वेगवेगळी आहेत. तीन कंपन्या मॅपिंगसाठी ड्रोन वापरू इच्छित आहेत. त्याच वेळी, काही कंपन्या डिलिव्हरीसाठी. तर काही स्काय एअर मोबिलिटी ही डिलिव्हरी स्टार्टअप डुंजो डिजिटल प्रा.लिमिटेडने पार्टनर म्हणून या ट्रायलमध्ये सहभाग घेतला आहे. ही ड्रोन ट्रायल केवळ औषधे आणि लसांच्यापुरता मर्यादित नाही. तर राष्ट्रीय महामार्गांचे मॅपिंग, रेल्वे रुळांचे मॅपिंग, शेतीशी संबंधित स्मार्ट काम, कृषी जमिनीचे सर्वेक्षण, जंगलांचे निरीक्षण, सर्विलांस अशा अनेक कामांसाठी ड्रोन वापरण्याची व्यवहार्यता तपासली जाणार आहे. यामुळे भविष्यात ड्रोनद्वारे ई-कॉमर्स वितरण देखील केले जाऊ शकते का हे पाहिले जाणार आहे.

तेलंगणाचा प्रोजेक्ट किती वेगळा आहे?

तेलंगणामध्ये ड्रोनद्वारे वस्तू वितरण करण्याचा प्रयोगावर मार्च २०२० मध्ये काम सुरू झाले आहे. तेलंगणामधील असे चार जिल्हे आहेत जेथे अद्याप रस्ता नाहीत. परंतु काही भागांत रस्ते असूनही इतर परिस्थिती फारशी चांगली नाही. या भागांत पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था फार बिकट असते. त्यामुळे अशा जिल्ह्यांत आरोग्य सुविधा जलद गतीने वितरण करण्यासाठी ड्रोन वापरण्याच्या कल्पनेला सुरुवात झाली. वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) च्या ‘मेडिसिंज फ्रॉम द स्काय’ कार्यक्रमांतर्गत हे नियोजन झाले आहे. या प्रयोगाचे सुरुवातीचे ध्येय म्हणजे रुग्णांना आरोग्य सुविधा म्हणजेच औषधे आणि रक्त इ. पोहोचवण्यासाठी ड्रोन वापरण्याच्या करणे. या योजनेत एनआयटीआय आयोग देखील सहभागी असून त्यामुळे कोविडशी संबंधित औषधे आणि लसींचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रयोगासाठी ८ कंपन्यांची निवड झाली आहे. त्यापैकी तीन कंसोर्टियमवरही काम करत आहे. ज्यात फ्लिपकार्ट, डुंजो डिजिटल प्रा.लि आणि ब्ल्यूडार्टचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ट्रायलला २१ ते २२ जूनच्या आसपास सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु तारखा अद्याप ठरल्या नाहीत. या ट्रायलमध्ये तीन किलोच्या पेलोडसह ड्रोन उडवणार आहे. यात दीड किलो वजनाच्या लसीच्या १० हजार कुंप्या आहेत. उर्वरित १.५ किलो वजन कोल्ड बॉक्स आणि कोरडे बर्फाचे असेल, जे लसीचे तापमान राखण्यासाठी आवश्यक आहे.

आयसीएमआरने का दिली निविदा?

कर्नाटक आणि तेलंगणामध्ये ड्रोनच्या वापराबाबत काम सुरू झाले तेव्हा आयसीएमआरलाही असे वाटले की, ड्रोनचा वापर करुन लसींचा साठा दुर्गम भागात पोचवण्यासाठी करता येईल. यासाठी आयआयटी कानपूर यांच्या सहकार्याने यावर फिजिबिलिटीवर स्टडी केली. यातून ड्रोनद्वारे लसी किंवा वस्तू वितरीत करणे शक्य आहे का हे पाहिले गेले? त्यासाठी डीजीसीएकडून आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या. त्यानंतर ए आयसीएमआरच्या वतीने केंद्र सरकारसाठी लस खरेदी करणाऱ्या एचसीएल इन्फ्रा टेक सर्व्हिसेस या मिनीरत्न कंपनीने ११ जून रोजी निविदा काढल्या. यामध्ये काही अटी व शर्तीसह कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. ज्या ड्रोनद्वारे देशभर दुर्गम भागात लस पोहचवू शकतात का हे पाहण्यात आले.

ड्रोनद्वारे लस किंवा वस्तूंचा पुरवठा किती वेळात होईल?

कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुरू असलेल्या ट्रायलच्या निकालांच्या आधारे प्रत्येक गोष्ट निश्चित केली जाईल. परंतु या परवानग्या डीजीसीएला द्याव्या लागतील, ज्यानंतर ट्रायलच्या तारखा ठरवतील. जर सर्व काही ठीक झाले तर या पावसाळ्यातच ड्रोनद्वारे वस्तू आणि औषधांची डिलिव्हरी केली जाऊ शकते. भारतात ड्रोनमधून वस्तूंची वितरण औषधे आणि लस स्वरूपात सुरू आहे. पुढे जाऊन ई-कॉमर्स कंपन्या दुर्गम भागात डिलिव्हरीसाठी ड्रोन देखील वापरु शकतात.


खाद्यतेल झाले स्वस्त, पाहा खाद्य तेलांचे नवीन दर


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -