घरताज्या घडामोडीप्रौढांपेक्षा लहान मुलांना Covid-19च्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी, WHO आणि AIIMSच्या नव्या...

प्रौढांपेक्षा लहान मुलांना Covid-19च्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी, WHO आणि AIIMSच्या नव्या अभ्यासात दावा

Subscribe

WHO केलेल्या नव्या अभ्यासातून देशातील नागरिकांना दिलासा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाटेचा धोका प्रौढांपेक्षा लहान मुलांना कमी असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि दिल्लीच्या AIIMS रुग्णालयातील तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात केला आहे. ((Children younger than adults have lower risk of third wave of Covid-19, claims new study from WHO and AIIMS)) कोरोना व्हायरसच्या बदलणाऱ्या व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र WHO केलेल्या नव्या अभ्यासातून देशातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

देशात  लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याची चिंता व्यक्त केल्याने त्यावर अभ्यास करण्यात आला. त्यासाठी ५ राज्यांमधून जवळपास१० हजार लोकांचे सॅम्पल्स घेण्यात आले. त्यानंतर एक पूर्व प्रकाशन सर्व्हर तयार करण्यात आले. हा अहवाल ४ हजार ५०९ सहभागींच्या विश्लेषणावर आधारित आहे. ज्यात १७ वर्षे वयोगटातील ७०० मुले आणि ३ हजार ८०९ वयोगटातील १८ हून अधिक मुलांचा समावेश करण्यात आला होता.

- Advertisement -

नवी दिल्ली येथील कम्युनिटी मेडिसीनचे प्रोफेसर पुनीत मिश्रा म्हणाले की, दिल्लीतील निर्वीसीत वसाहती अतिशय दाटी वाटी वस्ती असलेल्य आहेत. जिथे सेरोप्रिव्हलेन्स हा ७४.७ इतका आढळला. आतापर्यंत झालेल्या सेरो सर्वेक्षणातील हा आकडा सर्वाधिक होता. सर्वेमध्ये असे म्हणण्यात आले आहे की, कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या आधी दक्षिण दिल्लीत राहणाऱ्या १८ वर्षाहून लहान मुलांचे सेरोप्रिव्हलेन्स ७३.९ टक्के होता. डॉ. मिश्रा यांनी असे म्हटले आहे की, दिल्ली आणि एनसीआरमध्येक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सेरोप्रिव्हलेन्स अधिक होता. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी सेरोप्रिव्हलेन्स हे कवच बनू शकते. या सर्वेनुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोक नसल्याचे सांगण्यात आले आहे.

नवीन सेरो सर्वेक्षण अहवालानुसार असे समोर आले कोरोनाचा पॉझिटिव्हटी दर प्रौढांच्या तुलनेच लहान मुलांमध्ये अधिक आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा सर्वाधिक धोका २ वर्षांवरील मुलांमध्ये सर्वाधिक प्रभावित करेल असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -