घरताज्या घडामोडीCoronavirus : २४ तासांत जगात १ लाख २९ हजार नवे कोरोना रुग्ण

Coronavirus : २४ तासांत जगात १ लाख २९ हजार नवे कोरोना रुग्ण

Subscribe

जगभरात कोरोनाने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून चिंताजनक बातमी म्हणजे गेल्या २४ तासांत जगात १ लाख २९ हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

जगभरात कोरोनाने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून चिंताजनक बातमी म्हणजे गेल्या २४ तासांत जगात १ लाख २९ हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ६६.९८ लाखावर गेला आहे. तर मागील २४ तासांत जगातील २१३ देशांमध्ये जवळपास १ लाख २९ हजार नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत. तर २४ तासांत ५ हजार ४९९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात आतापर्यंत मृत्यूंची संख्या ३ लाख ९२ हजार वर पोहोचली आहे.

३२ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

दिलासादायक बाब म्हणजे ज्या आकडेवारीने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याच संख्येने कोरोना रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत जगभरात ३२ लाख रुग्ण बरे झाले आहेत. जगातील ७६ टक्के कोरोनाबाधित हे केवळ १४ देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ५१ लाखांच्या घरात आहे.

- Advertisement -

भारत जगात सातव्या स्थानावर

वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात सातव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे २२६,७१३ रुग्ण आहेत. तर ६ हजार ३६३ बळी कोरोनामुळे गेले आहेत. सध्या भारतात १११,९०० अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत १०८,४५० जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

कोणत्या देशात किती कोरोनाबाधित

  • अमेरिका :
    कोरोनाबाधित : १,९२३,८८७ मृत्यू – ११०,१७३
  • ब्राझील :
    कोरोनाबाधित : ६१५,८७० मृत्यू – ३४,०३९
  • रशिया :
    कोरोनाबाधित : ४४१,१०८ मृत्यू – ५,३८४
  • स्पेनन:
    कोरोनाबाधित : २८७,७४० मृत्यू – २७,१३३
  • युके :
    कोरोनाबाधित : २८१,६६१ मृत्यू – ३९,९०४
  • इटली :
    कोरोनाबाधित : २३४,०१३ मृत्यू – ३३,६८९
  • भारत :
    कोरोनाबाधित : २२६,७१३ मृत्यू – ६,३६३


    हेही वाचा – केरळ : गर्भवती हत्तीणीच्या खून प्रकरणी दोघांना अटक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -