Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Covid-19 दुसऱ्या लाटेचा फटका GST संकलनावरही

Covid-19 दुसऱ्या लाटेचा फटका GST संकलनावरही

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे GST संकलनावर परिणाम झाला आहे. पण तरीही जुलै २०२० च्या तुलनेत यंदाच्या वर्षीचा जीएसटी महसुल हा ३३ टक्के अधिक आहे. वस्तूंच्या आयातीमधून मिळणारा महसूल ३६ टक्के अधिक राहिला. देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत ३२ टक्के अधिक राहिला आहे. देशात जीएसटी संकलन हे सातत्याने आठ महिन्यांपर्यंत १ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक होते. त्यानंतर जून २०२१ मध्ये कमी होऊन १ लाख कोटी रूपयांच्या टप्प्यावरून हे संकलन खाली आहे. पण यंदा मे २०२१ च्या दरम्यान अनेक राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या फटक्यामुळे अनेक ठिकाणी पूर्ण किंवा अंशतः लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळेच या लॉकडाऊनचा फटका हा जदीएसटी संकलनावरही झाला. पण कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर मात्र पुन्हा जुलै २०२१ मध्ये जीएसटी संकलन सुधारण्यास सुरूवात झाली. महाराष्ट्रात जुलै 2020 मधील जीएसटी महसुलाचे संकलन 12,508 कोटी रुपये इतके होते, तर जुलै 2021 मधील जीएसटी महसुलाचे संकलन 18,899 कोटी रुपये इतके झाले. यामध्ये 51 % इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जुलै 2021 महिन्यात एकूण 1,16,393 कोटी रुपये जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महसूल संकलित करण्यात आला आहे. त्यापैकी सीजीएसटी 22,197 कोटी रुपये, एसजीएसटी 28,541 कोटी रुपये, आयजीएसटी 57,864 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा 27,900 कोटी रुपयांच्या समावेशासह आणि अधिभार 7,790 कोटी रुपये )वस्तूंच्या आयातीवर संकलित 815 कोटी रुपये संकलनासह) आहे. वरील आकडेवारी मध्ये 1 जुलै 2021 ते 31 जुलै 2021 दरम्यान दाखल करण्यात आलेल्या जीएसटीआर – 3B परताव्यांमधून मिळालेला जीएसटी महसूल तसेच त्याच कालावाधीसाठी आयातीमधून गोळा झालेला अधिभार आणि आयजीएसटी यांचा समावेश आहे.

- Advertisement -

जून 2021 च्या जीएसटी संकलनाच्या प्रेसनोटमध्ये 1 जुलै ते 5 जुलै 2021 दरम्यान दाखल केलेल्या परताव्यांसाठी 4,937 कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनाचा देखील समावेश करण्यात आला होता. कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 5 कोटी पर्यंतच्या उलाढाल असणाऱ्या करदात्यांना परतावा दाखल करण्याचा करण्यासाठी माफी / कमी व्याज अशा विविध स्वरूपात सवलतीचे उपाय देण्यात आले होते. सरकारने नियमित परतावा म्हणून आयजीएसटीमधून 24,100 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 28,087 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत.

- Advertisement -