देशात covid-19 च्या दुसऱ्या लाटेचा मुक्काम १०० दिवस, एप्रिलमध्ये दुसरी मोठी लाट येणार – अहवाल

Centre rushes teams to six states reporting high number of Covid-19 cases
वाढते कोरोनाचे संकट: सहा राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथक दाखल

भारतात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येने ५० हजारांचा आकडा गाठला. पण या covid-19 मध्ये दुसऱ्या लाटेचा परिणाम हा किती दिवस असेल याबाबतचा एक अहवाल समोर आला आहे. SBI बॅंकेच्या मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या सोम्या कांती घोष यांनी १५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कोरोना लाटेचा प्रभाव किती असेल याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोना लाटेचा परिणाम हा १५ फेब्रुवारीपासून १०० दिवसांपर्यंत असेल असा दावा SBI अहवालात करण्यात आला आहे. पण त्याचवेळी देशभरात सुरू असलेल्या कोरोना विरोधातील लसीकरणामुळे भारतात कोरोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगली परिस्थिती असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. सद्यस्थितीला कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे कोरोना लसीकरण असल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे. येत्या एप्रिलच्या पंधरवड्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असेही अहवालात नमुद करण्यात आले आहे.

गेल्या २४ तासांमध्ये एकाच दिवसात ५३ हजार ४७६ कोरोना रूग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे देशात कोरोना रूग्णांची संख्या ही १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ इतकी झाली आहे असा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडा जाहीर केला आहे. भारतात सलग १५ व्या दिवशी कोरोना रूग्णांचा आकडा वाढत आहे. गेल्या पंधरवड्यातच ३ लाख ९५ हजार १९२ कोरोना रूग्णांची भर पडलेली आहे. त्याचवेळी संपुर्ण भारतात कोरोनाविरोधात लसीकरणाच्या मोहीमेत ५.३ कोटी नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे.

कोरोनाची दुसरी लाट एप्रिलमध्ये 

फेब्रुवारीच्या सुरूवातीलाच कोरोना रूग्णांची संख्या वाढण्याची सुरूवात झाली होती. दुसऱ्या कोरोनाच्या लाटेमध्ये संपुर्ण भारतात २५ लाख रूग्णांची भर पडली आहे. सध्या कोरोना रूग्णांची आकडेवारी पाहता कोरोना लाटेचा सर्वोच्च असा पिक पिरीयड एप्रिलच्या शेवटच्या टप्पात येण्याची शक्यता अहवालात नमुद करण्यात आली आहे. एकट्या महाराष्ट्रातच सध्या सर्वाधिक अशी कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. जागतिक पातळीवरच कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट मोठी असल्याची आतापर्यंतची आकडेवारी आहे. पण सध्या कोरोनाच्या लसीकरण मोहीमेमुळे यामध्ये थोडा फरक पडेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. पण अशा परिस्थितीतही कोरोना लसीकरणामुळे कोरोनाची लाट नियंत्रित करता येईल असेही अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

सद्यस्थितीला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध यासारखे परिणाम हे उपायकारक ठरत नसल्याचे मत अहवालात मांडण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यातही अशीच परिस्थिती दिसत आहे. एसबीआयने हा संपुर्ण अहवाल १९१८-१९ च्या महामारीशी तुलना करत मांडला आहे.