घरताज्या घडामोडीLive Update: उद्धव ठाकरे हेच सचिन वझेंचे वकील वाटतात- फडणवीस

Live Update: उद्धव ठाकरे हेच सचिन वझेंचे वकील वाटतात- फडणवीस

Subscribe

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लबाड सरकार म्हणजे ठाकरे सरकार, वीज तोडणीवरील स्थगिती उठवणे ही लबाडी- फडणवीस


लॉकडाऊनची वेळ आणू देऊ नका- मुख्यमंत्री

- Advertisement -

कांजूरला ३ लाईन्सची कारशेड होणार- मुख्यमंत्री


वाझे म्हणजे ‘लादेन’ असे चित्र निर्माण केलं जात आहे- मुख्यमंत्री

- Advertisement -

महावितरण कंपनीवरील कर्जाचा बोझा वाढतोयं- अजित पवार


विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त झालं- मुख्यमंत्री


यंदाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलै २०२१ रोजी मुंबईत होणार


विधानपरिषदेचे १० व्या दिवसाचे कामकाज संपले.


कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली कोरोना लस 

कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोरोनाचा पहिला ठोस घेतला आहे. त्यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे.


अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट, सचिन वाझे निलंबन प्रकरण आजही गाजणार

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यानंतर मुंबई क्राइम ब्रांच मधील अधिकारी सचिन वाझे हे टीका आणि आरोपांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून वाझे निलंबन प्रकरण आजही गाजण्याची शक्यता आहे


खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

खासदार मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरुन डेलकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डेलकर प्रकरणी तपास करण्यासाठी एसआयटीची घोषणा केली आहे. डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचं नाव आहे. डेलकर यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले होते, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.


अमेरिकेत हजारो लोकांना दिला फायझर लसीचा चुकीचा डोस!

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये कोरोना लसीचे चुकीचे डोस दिल्याचे समोर आले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, हजारो लोकांना फायझरच्या कोरोना लसीचा डोस गरजेपेक्षा कमी दिला आहे. त्यामुळे सध्या अमेरिकेत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे.


देशात आतापर्यंत २ कोटी ४० लाख लोकांना कोरोनाची लस

देशात १ मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येत आहे. देशात आतापर्यंत २ कोटी 40 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.


वसंतदादा साखर कारखानाच्या अध्यक्षासह १६ संचालकाविरोधात गुन्हा

जीएसटीचे १२ कोटी बुडवल्याप्रकरणी वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह १६ संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंतदादा साखर कारखान्यातील विक्री केलेल्या मालावर व्यापाऱ्याकडून जीएसटी घेऊन १२ कोटी ४४ लाखाची रक्कम राज्य जीएसटी कार्यालयात भरण्यात आली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रवी पुजारीच्या पोलीस कोठडीत १५ मार्चपर्यंत वाढ

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने पोलीस कोठडी वाढवून मागितली आहे. येत्या १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.


औरंगाबादमध्ये मास्क न वापरल्यास आता पोलीसही करणार कारवाई

मास्क न वापरल्यास आता पोलीसही कारवाई करणार आहेत. शहरात येणाऱ्या सीमांवरच मास्क तपासणी केली जाणार असून पोलिसांनी वसूल केलेली दंडात्मक रक्कमेतील पन्नास टक्के रक्कम पोलिसी कल्याण निधीसाठी तर 50 टक्के रक्कम महापालिकेकडे द्यावी लागणार आहे.


मोहोळ तुरुंगातील १३ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह

सोलापुरातील मोहोळ पोलीस स्टेशन तुरुंगातील १३ आरोपी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


आनंदवन ठरतंय कोरोनाचं हॉटस्पॉट

चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन कोरोनाचं हॉट-स्पॉट ठरत आहे. आनंदवनातील 239 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळं आनंदवनमध्ये पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला असून बाहेरील लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रेलर आणि ट्रकचा भीषण अपघातात झाला. पुण्याकडे जाताना बोरघाटाच्या सुरुवतीला हा अपघात झाल्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतुक थाबंवली असून ट्रकमधले ड्रम गरम होऊन ब्लास्ट होत असल्याने फायर ब्रिगेड टिमला अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.


तुरुंगातील १३ आरोपी कोरोना पॉझिटीव्ह

सोलापुरातील मोहोळ पोलीस स्थानकातील १३ आरोपींना कोरोनाची बाधा झाली आहे.


अमेरिकेत हजारो लोकांना दिला फायझर लसीचा चुकीचा डोस!

जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे. पण यादरम्यान अमेरिकेत खळबळजनक घटना घडली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये कोरोना लसीचे चुकीचे डोस दिल्याचे समोर आले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, हजारो लोकांना फायझरच्या कोरोना लसीचा डोस गरजेपेक्षा कमी दिला आहे. १ मार्चला ऑकलँडच्या लसीकरण केंद्रावर हजारो लोकं पोहोचले होते. दरम्यान चुकीच्या डोस देण्याचा एवढाच मुद्दा नसून लोकांनी लसीकरण केंद्रावर सिरिंज कमी असल्याची तक्रार केली आहे. यामुळे अनेकांना कोरोना लस मिळू शकली नाही आहे. त्यामुळे सध्या अमेरिकेत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे. (वाचा सविस्तर)


‘कुछ बडा करते हैं’च्या नादात घात!

मुंबई पोलीस आयुक्तपदासाठीचे निकष केवळ सीआर, अतुलनीय कामगिरी किंवा प्रशासकीय अनुभव हा न ठेवता आपल्या सोयीप्रमाणे पोलीस आयुक्त असावा, आपण सांगू तेच त्याने करावे अशी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांची धारणा मुंबई पोलिसांच्या मुळावर आली आहे. कनिष्ठ असूनही आयुक्तपदाच्या क्रमवारीत ज्येष्ठ अधिकार्‍यांना डावलणे, चमको अधिकार्‍यांना क्रिम पोस्टींग मिळणे यावरून गुन्हे, कायदा सुव्यवस्था, आर्थिक गुन्हे अन्वेषणसह प्रशासन या महत्वाच्या ठिकाणी आनंदी आनंद आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये सगळ्याच मुख्यमंत्र्याच्या काळात हे होत आले. त्यामुळे राज्यकर्त्यांनी आपली सोय बघण्यापेक्षा तुमच्या माझ्या मुंबईचा विचार केला तर ‘कुछ बडा करते हैं’च्या नादात सचिन वाझेसारखा अधिकारी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करू शकला नसता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत, त्या त्यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता पूर्ण कराव्यात.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -