घरताज्या घडामोडीLive Update: चेन्नईमध्ये लोकल सुरू होणार

Live Update: चेन्नईमध्ये लोकल सुरू होणार

Subscribe

चेन्नईमध्ये लोकल सुरू होणार

चेन्नईमध्ये लोकल सुरू होणार असल्याची माहिती केंद्रिय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. चेन्नईमध्ये उपनगरीय लोकल सेवा उद्या पासून नॉन पिक अवर्समध्ये सामान्यांसाठी धावणार आहे.

- Advertisement -

राज्यात ३ हजार १०६ नवीन रुग्णांची नोंद तर ७५ रुग्णांच्या मृत्यू

राज्यात ३,१०६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,०२,४५८ झाली आहे. राज्यात ५८,३७६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४८,८७६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा )

- Advertisement -

 


भारतात लंडनहून आलेले परतलेल्या प्रवाशांपैकी पाच प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.


गेल्या २४ तासांत देशात १९ हजार ५६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३०१ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तसे ३० हजार ३७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ७५ हजार ११६ झाली आहे. यापैकी १ लाख ४६ हजार १११ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९६ लाख ३६ हजार ४८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या २ लाख ९२ हजार ५१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


२१ डिसेंबरपर्यंत देशात १६ कोटी ३१ लाख ७० हजार ५५७ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून यापैकी काल दिवसभरात १० लाख ७२ हजार २२८ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


जगातील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ७ कोटी ७७ लाख १३ हजारांवर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १७ लाख ८ हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर ५ कोटी ४५ लाख ८८ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -