Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Vaccination: महिलांनी मासिक पाळीदरम्यान लस घ्यावी की नाही? नीति आयोगाने दिले...

Corona Vaccination: महिलांनी मासिक पाळीदरम्यान लस घ्यावी की नाही? नीति आयोगाने दिले उत्तर

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. यामुळे कोरोना व्हायरसला थोपविण्यासाठी लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. कोरोना लसीकरणाची मोठ्या प्रमाणात मोहीम राबवून सर्वांपर्यंत पोहोचवली जात आहे. आता १ मेपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस घेण्याची परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. पण यादरम्यान कोरोना लसीकरणाबाबत समाजात एक अफवा पसरत आहे ती म्हणजे महिलांनी मासिक पाळी दरम्यान कोरोना लस घेऊ नये, असे व्हायरल होत आहे. पण याचे उत्तर आता नीति आयोगाने दिली आहे.

नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, ‘मासिक पाळी दरम्यान महिलांना लस घेता येईल का? असे विचारले जात आहे. तर त्याचे उत्तर आहे होय, मासिक पाळीदरम्यान लस घेतली जाऊ शकते. कोरोना लसीकरण पुढे ढकलण्याचे हे कारण नाही आहे.’

- Advertisement -

गोव्यातील मणिपाल रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. शेखर साळकर यांनी आज पत्र सूचना कार्यालयाने धेंपे महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या “लसीकरणाची आवश्यकता का?” या विषयावरील वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले होते. या कार्यक्रमात देखील मासिक पाळीदरम्यान लस घ्यावी की नाही? याबाबत त्यांनी सांगितले. डॉ. शेखर साळकर म्हणाले की, ‘कोविड लसीकरणाविषयक कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका. महिलांनी मासिक पाळीच्या काळात लसीकरण करून घेणे अगदी सुरक्षित आहे.’


- Advertisement -

हेही वाचा – India Covid-19 Update: चिंताजनक! महाराष्ट्रासह ‘या’ आठ राज्यात एक लाखांहून अधिक रुग्ण सक्रिय


- Advertisement -