घरCORONA UPDATEकोरोना आहे की नाही? आता आवाजावरून कळणार

कोरोना आहे की नाही? आता आवाजावरून कळणार

Subscribe

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात संशोधक काम करत आहेत. त्यात आता कोरोनाची लक्षण नसतानाही अनेकजणांना त्याची लागण झाल्याचे समोर येत आहे. यामुळे कोरोना झालाय हे ओळखायचे तरी कसे हा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे. याचदरम्यान, कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी आवाजावरून कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे ओळखणारे अॅप तयार केल्याचा दावा केला आहे. COVID Voice Detector असे त्याला नाव देण्यात आले आहे.

तसेच स्वस्त आणि तत्काळ निदान करणारे हे अॅप असल्याने रुग्णावर तातडीने उपचार करणे शक्य असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे. हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर ल़गेच हे काम सुरू करते. त्यात सर्वप्रथम संबंधित व्यक्तीला तीन वेळा खोकण्यास सांगितले जाते. नंतर तुम्हांला बोलण्यास सांगण्यात येते. कारण खोकल्यावरून व बोलण्यावरून संबंधित व्यक्तीचे फुफ्फुस किती कार्यक्षम आहे ते कळते. या संपूर्ण प्रक्रियेला पाच मिनिटांचा अवधी लागतो. यादरम्यान अॅपमध्ये व्यक्तीला त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागते. त्यानंतर व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही ते कळते. दरम्यान कोरोनाची तपासणी करण्यासाठी अनेक अॅप तयार करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -