घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत गेल्या २४ तासांत १,१४५ नव्या रुग्णांची वाढ!

Live Update: मुंबईत गेल्या २४ तासांत १,१४५ नव्या रुग्णांची वाढ!

Subscribe

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी सापडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजील आहे. घटनास्थळी आता पोलीस आणि श्वान पोहोचले आहेत.


मुंबई गेल्या २४ तासांत १ हजार १४५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख २२ हजार ८४३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ४५८ जणांचा मृत्यू झाला असून ३ लाख १ हजार ५२० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -


मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर करण्याची मागणी केली आहे. Adv. प्रशांत केंद्र यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

यंदाच अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन आठवड्याचं – देवेंद्र फडणवीस


विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा मुद्दा अधिवेशनाच्या कामकाजात नाही – देवेंद्र फडणवीस


वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावरील महंत कबिरदास महाराज यांच्यासह कुटुंबातील ४ जणांचा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


वनमंत्री संजय राठोड यांना पोहरादेवी गडावरील शक्तीप्रदर्शन पडले महागात. महंतांसह १९ जणांना कोरोनाची बाधा


चित्रा वाघ वानवडी पोलिस स्टेनशमध्ये दाखल. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील पोलिसांवर दबाव, याप्रकरणातील पोलिसांचा तपास  निष्काळजीजनक आहे. त्यामुळे पुणे पोलिस रक्षण नाही भक्षक आहे अशा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला. पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पुणे पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. आत्महत्येच्या तक्रारीबद्दल विचारणा केली असताना तक्रार नाही असे वानवडी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड यांच्याकडून सांगण्यात आले. पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी कुणाचा लेखी आदेश हवा आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन अजून कोणाचे आदेश हवा आहे ? असा सवाल यावेळी चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. त्यामुळे संजय राठोडला चपलेने झोडला पाहिजे. संजय पुजाचा हत्यार आहे. त्याचा लवकरचं राजीनामा घ्यावा. तसेच पुणे पोलिसांकडून तपास काढून घेतला पाहिजे. या तपासात सक्षम आयपीएस अधिकाऱ्याला तपास दिला पाहिजे कारण पुणे पोलिस चाकरी करतं आहेत.


चित्रा वाघ यांच्याकडून पुजा चव्हाण आत्महत्येचे घटनास्थळ वानवडीत प्रत्यक्ष पाहणी दौरा, प्रत्यक्षदर्शींसोबत घटनास्थळी पाहणी केली. पूजा चव्हाणचा फ्लॅट सील, काय आणि कसे घडले याची पाहणी करतेयं, स्थानिक नेत्यांकडून माहिती घेणार असल्याचे चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण, वनमंत्री संजय राठोडांविरोधात भाजप अधिक आक्रमक


देशात खाजगी लसीकरणास मुभा देण्यात आली आहे. २० हजार रुग्णालयांना परवानगी यासाठी परवानगी मिळणार आहे.


चित्रा वाघ वानवडीतील घटनास्थळी देणार. सकाळी 11 वा. पत्रकार परिषद घेणार आहे. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनाही भेटणार आहेत.


माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणातून हर्षवर्धन जाधव यांना मिळाला जामीन मिळाला होता. पुन्हा गौरवर्तन न करण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर झाला होता, हर्षवर्धन जाधव यांच्याकडून गौरवर्तन झाल्याचा दावा करत उच्च न्यायालयात अर्ज, सरकारी वकील डी आर काळे यांच्या वतीने केला उच्च न्यायालयात अर्ज, जामीन का रद्द करू नये यासाठी हर्षवर्धन जाधव यांना नोटीस


नागपुरात अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवारी सर्व व्यवहार बंद, जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला असून, मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी जारी केले सुधारीत आदेश, ग्रंथालय, अध्ययन कक्ष, स्वीमिंग पुलंही राहणार बंद, आजपासून मंगल कार्यालय, लॅानमधील लग्न समारंभास प्रतिबंध


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -