घरदेश-विदेशभारतीय अर्थव्यवस्थेतील मंदी तात्पुरती - मुकेश अंबानी

भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदी तात्पुरती – मुकेश अंबानी

Subscribe

सौदी अरेबियातील रियाधमध्ये आयोजित 'फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह'मध्ये मुकेश अंबानी उपस्थितांना संबोधित करत होते. त्यावेळी मुकेश अंबानी यांनी वरील विधान केले.

देशात आर्थिक मंदी असल्याच्या या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे असताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनीसुद्धा भारतीय अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत असल्याचे म्हटले आहे. पण ही परिस्थिती तात्पुरती असून या परिस्थितीतून सावरण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलले आहे. त्यामुळे पुढील तिमाहीत अर्थव्यवस्थेत तेजी येईल, असा विश्वाससुद्धा मुकेश अंबानी यांनी यावेळी व्यक्त केला. सौदी अरेबियातील रियाधमध्ये आयोजित ‘फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह’मध्ये मुकेश अंबानी उपस्थितांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी वरील विधान केले.

काय म्हणाले मुकेश अंबानी?

२९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत रियाधमध्ये ‘फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह भारतातील अनेक दिग्गज उद्योगपती उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले की, “सद्य स्थितीला भारतीय अर्थव्यवस्थेत थोडी मंदी निश्चितच आहे. पण ही मंदी तात्पुरत्या स्वरुपाची आहे असं मला वाटतं. आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सरकार सुधारणा घडवून आणण्यासाठी उपाययोजना करत आहे. सरकारच्या या प्रयत्नांचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येईल. पुढील तिमाहीत परिस्थिती पूर्णपणे बदलेल,” असे मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -