घरताज्या घडामोडीVideo : दहीहंडी रद्द झाली; म्हणून काय झालं 'ही' गाणी ऐका, घरीच...

Video : दहीहंडी रद्द झाली; म्हणून काय झालं ‘ही’ गाणी ऐका, घरीच साजरा करा उत्सव!

Subscribe

भारतात श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. दहीहंडी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्साह पहायला मिळतो. या दहीहंडीत खरी रंगत आणतात ती म्हणजे बॉलिवूडची गाणी. यावर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे दहीहंडी उत्सव महाराष्ट्रात साजरा होणार नाहीये. पण दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणारी गाणी ऐकूण तुम्ही आनंद नक्कीच साजरा करु शकता. पाहूयात कोणती आहेत ही गाणी…

बाहुबली-२ मधील ‘ओ कान्हा सो जा जरा’ हे गाणं खूपच प्रसिद्ध आहे. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शेट्टी संध्याकाळचे भजन गात कन्हैयाला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

दहीहंडी म्हटलं तर गो गो गोविंदा हे गाणं हमखास मुंबई आणि आसपासच्या शहरांत ऐकायला मिळतं. या चित्रपटात अक्षय कुमारने अभिनय केला असला तरी गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि प्रभू देवा या गाण्यावर थिरकताना दिसले आहेत.

अमिताभ बच्चन आणि परवीन बॉबी यांच्या खुद्दार या चित्रपटातील मच गया शोर हे गाणं दही हंडीमध्ये वाजवलेच जाते. या गाण्यात अमिताभ बच्चन दही हंडी फोडताना दिसत आहेत.

- Advertisement -

अभिनेता आयुष्यमान खुराना याच्या ड्रिम गर्ल सिनेमातील राधे राधे हे गाणं जन्माष्टमीच्या उत्सावात एक वेगळीच रंगत आणतं.

‘लगान’ या चित्रपटातील अभिनेता आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांच्यावर चित्रित केलेलं हे गाणं जन्माष्टमीत तुम्ही ऐकू शकता.

हम साथ साथ है या सिनेमात अभिनेत्री करिश्मा कपूर, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांनी कन्हैयावर गाणं गायलं आहे. तसेच गाण्यात सुंदर नृत्य सुद्धा केलं आहे.

 

संजय दत्त च्या वास्तव चित्रपटातील हर तरफ है ये शोर हे गाणं दही हंडीच्या काळात प्रत्येकाच्या ओठांवर असते.

अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्या काला बाजार चित्रपटाती आला रे आला गोविंदा आला हे गाणं दही हंडीमध्ये गोविंदाचा आत्मविश्वास वाढवतो. दही हंडी उत्वात हे गाणं वाजवलेच जाते.

तर मराठी चित्रपटांमधली दहीहंडीची गाणी गाजली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -