दिल्लीत केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षच असुरक्षित, कारने नेले फरफटत

dcw chief swati maliwal dragged by car 10 to 15 metres in delhi

देशात अलीकडेच एका तरुणीला कार चालकाने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेत संबंधित तरुणाची मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण होत नाही तोवर केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनाही एका कार चालकाने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी पहाटे 3.11 वाजता घडली.

या घटनेमुळे दिल्लीत पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वाती मालीवाल यांना बुधवारी रात्री एका कार चालकाने 10 – 15 मीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेतून मालीवाल थोडक्यात बचावल्या. कारमध्ये बसण्यास विरोध केल्याने चालकाने हे कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत चौकशी सुरु आहे. स्वाती मालीवाल यांनी स्वत: ट्विट करत घडल्या प्रकाराला दुजोरा दिला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कारचालक हरिश्चंद्र (47) याला अटक केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मालीवाल यांनी मद्यधुंद कार चालकावर विनयभंगाता आरोप केला आहे. दिल्ली एम्सच्या गेट नंबर दोनवर मालीवाल यांनी कार चालकाला पकडण्यासाठी हात टाकला तेव्हा चालकाने कारची काच बंद करत त्यांना 10 ते 15 मीटरपर्यंत फरपटत नेले.

नेमकी घटना काय?

गुरुवारी रात्री उशिरा स्वाती मालीवाल महिला सुरक्षेच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. यावेळी मद्यधुंद अवस्थेत एक कार ड्रायव्हर तिथे आला आणि त्याने कारमध्ये बसण्याचा जबरदस्ती केली, यावेळी मालीवाल यांनी नकार देताच कार चालक निघून गेला, आणि पुन्हा यूटर्न घेऊन त्यांच्याजवळ आला.

यावेळी कार चालकाने पुन्हा स्वाती मालीवाल यांना कारमध्ये बसण्याची जबरदस्ती केली. यावेळी आरोपीला पकडण्यासाठी मालीवाल यांनी ड्रायव्हिंग सीटच्या दिशेने गेल्या आणि कारमध्ये हात टाकला, पण चालकाने लगेच कारची काच बंद केल्याने मालीवाल यांचा हात खिडकीतच अडकला. अशाप्रकारे आरोपीने मालीवाल यांना कारसोबत साधारण 10 ते 15 मीटरपर्यंत फरफटत नेले.

पण दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला, या प्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याची कार जप्त केली आहे. आरोपी दिल्लीच्या संगम विहारमधील रहिवासी आहे.


पीओकेनंतर करा, आधी काश्मिरी पंडितांचा जीव वाचवा; संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल