करदात्यांची चिंता मिटली! Income Tax Return दाखल करण्यासाठी मुदतवाढ

Deadline To File Income Tax Returns Extended To December 31
करदात्यांची चिंता मिटली! Income Tax Return दाखल करण्यासाठी मुदतवाढ

इन्कन टॅक्स रिटर्न (प्राप्तिकर विवरण) अजूनही न भरलेल्या करदात्यांची चिंता आता काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. कारण केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप टॅक्स भरलेला नाही अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारनं फाइन बसून नये म्हणून ही एक शेवटची संधी दिली आहे.

कोरोनामुळे दुसऱ्यांदा ही मुदत वाढवण्यात आली. अनेक करदात्यांना नव्या प्राप्तिकर ई-फायलिंग incometax.gov.in वेबसाईटवर काही तांत्रिक अडचणी येत असल्याने ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या व्यतिरिक्त टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत व्यवहारांबाबत अहवाल सादर करण्याची १५ जानेवारी २०२२ पर्यंत वाढ आली आहे. तर आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत व्यवहारांबाबत अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो करदात्यांना फायदा होणार आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ट्वीट करत यासंदर्भात माहिती जाहीर केली आहे. २०२१-२२ या निर्धारित वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न तसंच निरनिराळे लेखा अहवाल सादर करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे करदाते व इतर संबंधितांनी याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांना दिली. त्यामुळे ही मुदत वाढवण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

टेक्नोलॉजी कंपनी Infosysने तयार केलेल्या नव्या ई-फायलिंग पोर्टलचं www.incometax.gov.in ७ जूनला लाँचिंग झाले. मात्र करदात्यांना या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आणि इतर अडचणी येऊ लागल्या. यामुळे अनेक करदात्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ट्वीट करत याची माहिती दिली. यानंतर निर्मला सीतारमन यांनी याची दखल घेत पोर्टलची निर्मिती करणाऱ्या इन्फोसिसला खडे बोल सुनावले. याशिवाय सीईओ सलील पारेख यांना २३ ऑगस्टला समन्सदेखील बजावले. मात्र यामुळे अनेक लोकांचे IRT भरायचे राहिले आहेत.

करदात्यांच्या तक्रारीनंतर इन्कम टॅक्स विभागाने वेबसाइटवर सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे २०२०-२१ साठी आयटीआर दाखल करताना करदात्यांनी भरलेले विलंब शुल्क आणि अतिरिक्त व्याज परत केले जाईल असं जाहीर केलं होतं. मात्र आता Income Tax 2.0 नव्या पोर्टलमध्ये तुम्ही नवीन पेमेंट पद्धत वापरू शकणार आहात. नेट बँकिंग, UPI, क्रेडिट कार्ड, RTGS आणि NEFT द्वारे पेमेंट करता येणार आहे. नव्या साईटवर आयटीआर भरणं सोप आणि वेगानं होऊ शकेल.