घरCORONA UPDATEनिजामुद्दीन मरकज प्रकरणी मलेशियातील १२२ नागरिकांना जामीन

निजामुद्दीन मरकज प्रकरणी मलेशियातील १२२ नागरिकांना जामीन

Subscribe

दिल्ली कोर्टाने विजा नियमांचे उल्लंघन करत राजधानीत प्रवेश करणाऱ्या निजामुद्दीन परिसरातील तबलीगी जमात मरकजमध्ये सामील झालेल्या मलेशियातील १२२ नागरिकांना जामीन मंजूर केला आहे. या नागरिकांवर विजा नियमांचे उल्लंघन करण्याचा आरोप लावण्यात आला होता. तसेच अनधिकृतरित्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या सरकारी नियमांचे उल्लंघन करण्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मलेशियातील या नागरिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुनावणी दरम्यान परदेशी नागरिक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टासमोर हजर राहिले. त्यांची ओळख मलेशियातील उच्चायोगच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी केली.

जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना कोरोनावर उपाय योजना म्हणून केंद्र सरकारने संपूर्ण देशभर लॉकडाऊन केले होते. मात्र शासनाच्या निर्बंधा नंतरही दिल्ली येथील तबलीगी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात परदेशी नागरिकांसह देशातील आणि राज्यातीलही अनेक भागातील नागरिकांचा सहभाग असल्याचे एप्रिल महिन्यात समोर आले होते. त्यातच दिल्ली येथील तबलीगी कार्यक्रमात देशभरातून सहा हजारांहून अधिक नागरिक सहभागी असल्याची माहिती समोर आली होती.

- Advertisement -

हेही वाचा –

धक्कादायक! कुंकू लावलेल्या लिंबाचा प्रसाद खाऊन २० जणांना कोरोना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -