घरदेश-विदेशकोरोनातून बरे झाल्यानंतरही असेल धोका, तज्ज्ञांचा दावा

कोरोनातून बरे झाल्यानंतरही असेल धोका, तज्ज्ञांचा दावा

Subscribe

डॉक्टरांनी कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना दिला इशारा

देशभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू असताना स्पेनमध्ये जवळपास ७० हजार लोकांवर कोरोना विषाणूचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासातून असे दिसून आले की, कोरोना अँटीबॉडीजसाठी प्रथम आलेल्या १४ टक्के लोकं अँटीबॉडीज चाचणीत निगेटिव्ह आले आहेत. म्हणजेच, काही आठवड्यात अँटीबॉडीज त्यांच्या शरीरातून नाहिसे झाल्याचे समोर आले आहे. या अभ्यासानंतर, डॉक्टरांनी कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना इशारा दिला आहे.

इंग्लंडच्या विद्यापीठातील वायरोलॉजीचे प्राध्यापक इआन जोन्स या अभ्यासाचा निकाल प्रकाशित झाल्यानंतर म्हणाले की, जे लोक कोरोनातून बरे झाले आहेत आणि त्यांच्या अँटीबॉडीजची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांनी स्वतःला कोरोनापासून सुरक्षित आहोत, असे समजू नये. तर प्रो. जोन्स म्हणाले की, कोरोना अँटीबॉडीज चाचणीत पॉझिटिव्ह आलेले लोक कोरोनापासून सुरक्षित असतील, मात्र अद्याप हे स्पष्ट झालेले नाही. म्हणून, अशा लोकांनीही सध्य स्थितीत सावधगिरी बाळगली पाहिजे.

- Advertisement -

स्पेनमध्ये झालेल्या अभ्यासात अँटीबॉडीज रूग्णांच्या शरिरातून २ महिन्यांनंतर नाहिसे झाले. यानंतर, डॉक्टर असे गृहित धरत आहेत की, ज्या रुग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणं आढळले आहेत, त्या कोरोना रुग्णांत अँटीबॉडीज विकसित होत नाहीत. हा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांपैकी, स्पेनच्या कार्लोस-३ हेल्थ इन्स्टिट्यूटचे संचालक, रकील योती म्हणाले- ‘काही रुग्णांमध्ये ठराविक काळासाठी रोगप्रतिकार शक्ती असू शकते किंवा ती तात्पुरती उत्तम असू शकते पण ती काही काळानंतर कमी देखील होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी स्वतःचे रक्षण केले पाहिजे आणि इतर लोकांचेही रक्षण केले पाहिजे.


Corona: अमेरिका लस निर्मितीसाठी ‘या’ कंपनीला देणार १२ हजार कोटी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -