हवाला प्रकरणी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक

दिल्लीचे आरोग्यमंत्री संत्येद्र जैन यांना ईडीने अटक केली आहे. सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हवाला केस प्रकरणी प्रकरणी ईडीने त्यांच्यावर ही कारवाई केली. या प्रकरणात त्यांची सपत्ती तात्पुर्ती जप्त करण्यात आली आहे.

ईडीने ४.८१ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. मेसर्स अकिंचन डेव्हलपर्स, मेसर्स इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेडवर मनी लाँड्रिंग कायदा २००२ नुसार कारवाई करण्यात आली होती. सत्येंद्र जैन हे अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीने आज अटकेची कारवाई केली आहे. सत्येंद्र जैन यांच्यावर २०१५-१६ दरम्यान मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे. कोलकाता येथील बेनामी कंपन्यांमधील हवाला गुंतवणूक प्रकरणी त्यांच्यावर ईडीने कारवाई केली. सत्येंद्र जैन यांच्यासह अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपच्या कपिल मिश्रा यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.