Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश National Lockdown: कोरोनाला रोखायचं असेल तर देश लॉकडाऊन करा; केंद्रीय टास्क फोर्सची...

National Lockdown: कोरोनाला रोखायचं असेल तर देश लॉकडाऊन करा; केंद्रीय टास्क फोर्सची भूमिका

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा देशाला जोरदार तडाखा बसला आहे. दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांची रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर येत आहे. शनिवारी नवीन कोरोना रूग्णांची संख्या ही ४ लाखांवर गेली आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता कोविड -१९ टास्क फोर्सच्या सदस्यांनी केंद्र सरकारला राष्ट्रीय लॉकडाउन लागू करण्याचे आवाहन केलं आहे. काही दिवसांपूर्वीच ३ ते ५ मे दरम्यान देशात करोना रुग्णांची सर्वाधिक वाढ दिसून येईल, असं केंद्र सरकारला कोरोनाबाबत सल्ला देणाऱ्या पथकाच्या प्रमुखांनी सांगितलं होतं.

‘द संडे एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, देशात सध्या कोरोनाच्या संक्रमणात वेगाने वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक आहे. कोविड -१९ टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार कोरोना वेगाने आपले रूप बदलत असून यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवणं कठीण झालं आहे. जर कोरोनाचे रुग्ण असेच वाढत गेले देशाची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल, असं टास्क फोर्सने म्हटलं आहे.

- Advertisement -

कोविड -१९ टास्क फोर्समध्ये एम्स आणि आयसीएमआरसारख्या आघाडीच्या आरोग्य संस्थांमधील तज्ज्ञांचा समावेश आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता या अधिकाऱ्यांनी बर्‍याच बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये जे काही ठरलं त्याविषयीची माहिती टास्क फोर्सचे अध्यक्ष व्ही. के. पॉल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. “केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सचा गेल्या काही महिन्यांपासून हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की आपण देशभरात लॉकडाउन लावायला हवा. त्या त्या राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या स्वरुपात निर्बंध लावण्याऐवजी राष्ट्रीय लॉकडाउनची गरज आहे. कारण कोरोना सगळीकडे पसरायला लागला आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांनी सांगितलं.

टास्क फोर्सकडून तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये पहिला मुद्दा हा आहे की वेगाने होणारा प्रसार फक्त लॉकडाऊननेच नियंत्रणात आणता येईल. दुसरा मुद्दा म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष वाढू लागला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आपण हा प्रसार रोखण्यासाठी काही का करत नाहीत. अमर्याद रुग्ण, सुविधांचा तुटवडा यामुळे वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता असल्याचं टास्क फोर्सने म्हटलं आहे. तर तिसरा मुद्दा म्हणजे ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या परिस्थितीत तातडीने लक्ष घालणं आवश्यक आहे. आरोग्य सुविधांची तिथे मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असं टास्क फोर्सच्या सदस्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -