घरताज्या घडामोडीLive Update: एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण

Live Update: एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत एकनाथ खडसेंच्या स्वीय सहाय्यकांनी माहिती दिली आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचे नगराध्यक्ष Ad. हरीश रावळ यांना अटक करण्यात आले आहे. दारु पिऊन शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी हरीश रावळसह सहा जणांनावर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

आज वीज बील दरवाढीच्या पार्श्वभूमीवर मनसेची नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुढील दिशा ठरणार आहे.


राज्यात काही भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

मुंबई विद्यापिठाच्या प्रथम सत्र परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. बहुपर्यायी आणि वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.


देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार ५७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५८५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ८९ लाख ५८ हजार ४८४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३१ हजार ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८३ लाख ८३ हजार ६०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ४ लाख ४३ हजार ३०३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.


देशात १८ नोव्हेंबरपर्यंत १२ कोटी ८५ लाख ८ हजार ३८९ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहे. यापैकी काल दिवसभरात १० लाख २८ हजार २०३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


संपूर्ण जगात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे अनेक देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ५ कोटी ६५ लाख ५८ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १३ लाख ५४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ९३ लाख ४९ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहे.


राज्यात ५,०११ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,५७,५२० झाली आहे. राज्यात ८०,२२१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४६,२०२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -