घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटलॉकडाऊन नाही, जास्त टेस्टींग नाही, तरीही कोरोनावर जपानने विजय कसा मिळविला?

लॉकडाऊन नाही, जास्त टेस्टींग नाही, तरीही कोरोनावर जपानने विजय कसा मिळविला?

Subscribe

जपानमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. तसंच संक्रमण देखील हळूहळी कमी होत आहे. यामुळे आता जपानमध्ये आपत्कालीन परिस्थिती हटवण्यात आली आहे.

जपानमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने बरे होत असल्याने आपत्कालीन परिस्थिती संपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आश्चर्य म्हणजे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी जपानने आपल्या नागरिकांवर कोणतेही कठोर निर्बंध घातले नाहीत. येथे सलूनपासून रेस्टॉरंटपर्यंत सर्व काही उघडं होतं. चीनसारखा कोणताही हाय-टेक अ‍ॅप येथे तयार केलेला नाही जो लोकांचा मागोवा घेऊ शकेल. जपानमध्ये कोणतही रोग नियंत्रण केंद्र नाही. एवढेच नव्हे तर जपानमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या घेण्यात आलेल्या नाहीत. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की जपानने आपल्या लोकसंख्येपैकी केवळ ०.२ टक्के लोकांची चाचणी केली आहे, जे विकसित देशांमधील सर्वात कमी चाचणी दरापैकी एक आहे. जपानमध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

वासेडा युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर मिकाहितो तानाका म्हणतात, “मृत्यूची संख्या पाहता असे म्हणता येईल की कोरोना विषाणू रोखण्यात जपान यशस्वी झाला आहे, पण तज्ञांनाही त्याचे कारण माहित नाही.” जपानमधील माध्यमांच्या वृत्तानुसार, मास्क घालण्याची संस्कृती, लठ्ठपणाचे कमी दर आणि लवकर शाळा बंद करणे यासारखे अनेक निर्णय येथे संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरले.

- Advertisement -

काँटॅक्ट ट्रेसिंग

जपानमधील तज्ञ देखील कोरोनाशी लढताना त्यांच्या देशाच्या काँटॅक्ट ट्रेसरच्या भूमिकेचं कौतुक करतात. जानेवारीत कोरोना विषाणूची पहिला रुग्ण जपानमध्ये आढळल्यानंतर तेव्हाच काँटॅक्ट ट्रेसर्सनी त्यांचं काम सुरू केलं. २०१८ मध्ये ५०,००० पेक्षा अधिक परिचारिका जपानमधील सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत होती, त्यांना संक्रमण शोधण्यात अनुभव होता. सामान्य दिवसांमध्ये या परिचारिका इन्फ्लूएंझा आणि टीबी सारखं सामान्य संक्रमण कमी करण्याचं काम करतात. होक्काइडो विद्यापीठाच्या सार्वजनिक धोरणाचे प्राध्यापक काझुतो सुझुकी म्हणाले, “ही सिंगापूरसारखी अ‍ॅप-आधारित प्रणाली नाही, परंतु तरीही ती फार उपयुक्त ठरली आहे.” अमेरिका आणि यूके सारख्या देशांमध्ये आता कॉन्टॅक्ट ट्रेसर्स भरती करण्यास सुरवात झाली आहे. जपानने ट्रॅक करण्याचे काम प्रथम रुग्ण आढळला तेव्हाच सुरू केलं. हे तज्ज्ञ संक्रमणास सामोरे जाण्यासाठी गट, क्लब किंवा रुग्णालये यासारख्या ठिकाणांवर लक्ष ठेवतात जेणेकरुन प्रथम रुग्ण आढळल्यास त्याचा प्रसार होण्यापासून रोखता येईल.


हेही वाचा – ईदच्या दिवशी राहुल गांधी पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर, टॅक्सी चालकांची केली विचारपूस

- Advertisement -

सर्व जगाचं लक्ष पहिल्यांदा जपानवर गेलं जेव्हा फेब्रुवारी महिन्यात जपानच्या डायमंड प्रिन्सेस जहाजात शेकडो लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली. या जहाजामुळे कोरोनाचे सुरुवातीचे रुग्ण जपानला कळाले. कोरोना कसा पसरतो, तसंच कोरोनाची जनजागृती या जहाजामुळे झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात टीका होत असूनही जपानी तज्ञांना साथीच्या रोगाचा लवकर डेटा उपलब्ध करून देण्याचे श्रेय या जहाजाला दिलं जातं. या जहाजाने जपानमधील लोकांमध्ये जागरूकता आणली. प्रोफेसर तानाका म्हणाले, “जपानमधील लोकांसाठी, हे जहाज त्यांच्या घराबाहेर उभी असलेल्या जळत्या कारसारखं होतं.” आपण असं म्हणू शकता की इतर देशांच्या उलट जपानच्या तज्ञ-नेतृत्त्वाचा दृष्टीकोन आहे.

३ सी सूत्र

तज्ञांनी जपानमधील कोरोना विषाणूचं संक्रमण कमी होण्याचं श्रेय इथल्या ३ सी सूत्रांनाही दिलं. येथे तीन अर्थ आहेत -Closed spaces, Crowded spaces and Close-contact settings. म्हणजे बंद जागा, गर्दीची ठिकाणं आणि जवळच्या संपर्कांपासून दूर रहा. लोकांना एकमेकांपासून पूर्णपणे दूर ठेवण्याऐवजी येथे केवळ तीन सूत्र अवलंबलं गेलं आहे. होक्काइडो युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर काझुतो सुझुकी म्हणाले, “सामाजिक अंतर कामी येऊ शकेल पण सामान्य जीवन टिकवण्यासाठी ते खरोखर उपयुक्त नाही. त्याऐवजी, त्याच प्रभावासह तीन-सूत्र अधिक प्रभावी आहे.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -