घरदेश-विदेशमी काय शिलाजीतची रोटी खातो का? लैंगिक छळाच्या आरोपांवर Brijbhishan Singh भडकले

मी काय शिलाजीतची रोटी खातो का? लैंगिक छळाच्या आरोपांवर Brijbhishan Singh भडकले

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय महिला कुस्टीपटूंकडून बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्ली न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आता बृजभूषण सिंह यांनी आरोप फेटाळले असून त्यांनी गंभीर वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मी काय शिलाजीतची भाकरी खातो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ, मानसिक त्रास दिल्याच्या आरोप करत भारती दिग्गज कुस्तीपटूं गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यांनी या प्रकरणी दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान बृजभूषण सिंह यांनी आरोप फेटाळले असून प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, माझ्यावर आधी १०० मुलांचे शोषण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर १००० मुलांचे शोषण केल्याचा आरोप करण्यात आला. मी काय शिलाजीतची भाकरी खातो का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. जंतरमंतरवर सुरू असलेले आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचेही ते म्हणाले आहेत. बृजभूषण सिंह यांनी एक माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, जंतरमंतरवर आंदोलन करत असलेले कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु त्यांना अटक होत नाही तोपर्यंत कुस्तीपटू आंदोलन करत राहणार आहेत. कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला विरोध पक्षाकडून राजकीय पाठबळही मिळत आहे. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली असून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही जंतरमंतरवर पोहोचून कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शवला आहे.

बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध दोन एफआयआर
दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी बृजभूषण यांच्याविरुद्ध सात महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळ आणि धमकावण्याच्या आरोपांवरून दोन एफआयआर नोंदवले आहेत. पहिली एफआयआर अल्पवयीन व्यक्तीने केलेल्या आरोपांशी संबंधित आहे. या अंतर्गत, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यासह भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -