घरदेश-विदेशDonald Trump : पुन्हा एकदा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो तर भारतावर...; डोनाल्ड ट्रम्पची...

Donald Trump : पुन्हा एकदा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो तर भारतावर…; डोनाल्ड ट्रम्पची भारताला धमकी

Subscribe

पुढील वर्षी म्हणजेच 2024 च्या नोव्हेंबर महिन्यांत अमेरिकेच्या 60 व्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे दोन्ही डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन या पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे.

वाशिंग्टन : पुढील वर्षी म्हणजेच 2024 च्या नोव्हेंबर महिन्यांत अमेरिकेच्या 60 व्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे दोन्ही डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन या पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. अशातच पुन्हा एकदा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनण्याचे इच्छा मनी बाळगून असलेल्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पने सत्तेत आलो तर भारतावर जास्तीचा आयात शुक्ल लावू अशी धमकीच दिली आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचे जागतिक राजकारणावर काय परिणाम होतात हे पहावे लागणार आहे. (Donald Trump If I become the President of America again on India Donald Trump’s threat to India)

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे वर्णन टॅरिफ किंग म्हणून केले होते. ट्रम्प यांनी मे 2019 मध्ये, भारताने अमेरिकेला भारताच्या बाजारपेठांमध्ये प्रवेश न दिल्याचे कारण देत भारताची सामान्यीकृत प्रणाली (GSP) संपुष्टात आणली होती. आता पुन्हा ते एकदा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असून, त्यांचा विजय, पराजय भारतीय राजकारण आणि अर्थकारणावर परिणाम कसा करू शकतो हे येणारा काळ सांगणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव थांबवताच काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याने केली टीका

भारताच्या जास्तीच्या आयात शुल्कावर साधला निशाणा

सध्या अमेरिकेमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत भारताच्या आयात शुल्क प्रणालीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मला एकसमान आयात शुल्क हवे आहे. आयात शुल्क आकारणीच्या बाबतीत भारत खूप पुढे आहे. हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलवरील कर पाहता हे स्पष्टपणे दिसून येते. ते पुढे म्हणाले की, मला फक्त विचारायचे आहे की, भारतासारख्या ठिकाणी हे कसे होऊ शकते? तर ट्रम्प यांनी भारतीय आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे, तर भारत मात्र खूप जास्त आयात शुल्क लादतो. असेही ते या मुलाखतीत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : आधीच Wrong Side चालवत होती गाडी; महिलांनी अडवले तर थेट हाणामारीवरच उठली

ब्राझिलबाबतही केले वक्तव्य

याच मुलाखती दरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, शुल्काच्या बाबतीत ब्राझील खूप मोठे आहे. म्हणजे, खूप, खूप मोठे. पुढे ते म्हणाले की, जर भारताने आमच्याविरुद्ध आयात शुक्ल वाढवले, तर आम्हीही तसेच करू. माझा दृष्टीकोन परस्परपूरक आहे. याला तुम्ही बदला म्हटले तरी हरकत नाही. जर त्यांनी आमच्यावर जादा शुल्क लादले तर आम्ही प्रतिउत्तर देऊ असेही ते या मुलाखतीत म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून अनेक खटल्यांमध्ये अडकलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -