डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर पुन्हा होणार ॲक्टिव

जानेवारी 2021 मध्ये अमेरिकेत निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराला जबाबदार धरत ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवर बंदी घातली होती, 6 जानेवारी रोजी यूएस कॅपिटलमध्ये झालेल्या दंगलीसाठी त्यांना जबाबदार धरण्यात आलं होतं. त्यावेळी हिंसाचार आणखी वाढेल असा धोका लक्षात घेऊन ट्विटरने 88 मिलीयन फॉलोअर्स असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवर कायमचं बॅन करण्यात आलं होतं.

मात्र आता ट्विटरचा मालकी हक्क टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांच्याकडे जाणार आहे. या वर्षात ट्विटर खरेदीचा व्यवहार पूर्ण होणार आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर 44 अरब अमेरिकन डॉलर्संना विकत घेतले आहे. तेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील बंदी उठवण्याची दाट शक्यता सांगितली जात होती. ज्यावर आता इलॉन मस्क यांनी शिक्कामोर्तब केला आहे.

 

 सूत्रांच्या माहितीनुसार आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटवण्यात येणार आहे.

मात्र आता डोनाल्ड ट्रम्प पुन्हा ट्विटरवर येण्याची बातमी कळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.

 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वताःचे एक सोशल मीडिया प्लाटफॉर्म सुरू केले आहे. या ॲपचे नाव Truth Social असे असून या ॲपच्या माध्यमातून ट्विटरपेक्षा जास्त मोकळेपणाने मत मांडू शकतो.