मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली, रवी राणांचा गंभीर आरोप

Ravi Rana serious allegations of cm Uddhav Thackeray assassinated Balasahebs thoughts
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली, रवी राणांचा गंभीर आरोप

हनुमान चालीसा पठण केल्यामुळे एका महिला खासदाराला अटक करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची हत्या केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात संकट आले आहे. आमदार आणि खासदारांवर इंग्रजांच्या काळातील कायद्याचे कलम लावले. ज्या प्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इंग्रजांच्या कायद्याचे पालन हनुमान चालीसा वाचणाऱ्यांवर करत असेल तर महाराष्ट्राचे हे दुर्भाग्य असल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भ्रष्टाचाराची लंका असलेल्या मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारमुक्त करायचे असल्याचे रवी राणा यांनी म्हटलं आहे.

आमदार रवी राणा यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांचं स्वप्न होते बाळासाहेबांनी हिंदुत्व मजबूत करण्याचे काम केले. परंतु तुम्ही इंग्रजांच्या विचारावर चालून इंग्रजांच्या कायद्याचे वापर करुन जे लोकं धर्माचा प्रचार करतात. रामाचे नाव घेतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम तुम्ही करत आहात. बाळासाहेबांनी सांगितले की, मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे. परंतु तुम्ही सत्तेच्या मोहापायी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून मोदींच्या नावाने मत मागितली. मोदींचा फोटो मोठा लावला होता म्हणुन तुमचे आमदार आणि खासदार आले. मोदींचे नाव घेऊन मत जमा केले आणि जेव्हा सत्ता करायची वेळ आली त्याचवेळी तुम्ही भाजपला धोका देऊन पळ काढला आणि आघाडी करुन स्वतः मुख्यमंत्री झाले तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराची हत्या केली, विचारांची हत्या करुन शिवसैनिकांना तुम्ही पोरकं केलं आहे.

बाळासाहेब जर पाहत असतील तर दुखी होत असतील

तुम्ही १४ तारखेला जी सभा घेणार आहे. नेहमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकच सांगत असतात आम्ही मर्द आहोत. आम्ही मर्दासारखे काम करतो. परंतु बाळासाहेब ठाकरे पाहत असतील एका महिला खासदाराला ज्या मुख्यमंत्र्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन जेलमध्ये टाकले ही उद्धव ठाकरेंची मर्दानगी नाही आहे. एका महिलेला जेलमध्ये टाकून उद्धव ठाकरेंनी नामर्दानगीचे काम केले आहे. बाळासाहेब जर पाहत असतील तर दुखी होत असतील कोणाच्या हातात ही सत्ता गेली असे बोलत असतील.

राद्रोहाचे कलम इंग्रजांनी आणलं होत

ज्या पद्धतीने हनुमान चालीसाचे वाचन केल्यामुळे राजद्रोहाचा गुन्हा जे कठोर कारवाई इंग्रजांच्या काळात जे कलम लोकमान्य टिळक यांच्यापासून गांधीजी, सुभाष चंद्र बोस अनेक जे देशासाठी लढाय्या लढले त्या वेळी इंग्रजांनी हे कलम आणले होते. त्यांनी महापुरुषांवर कलम लावले त्याच कठोर कायद्याचा वापर करुन आम्ही हनुमान चालीसा वाचत आहे. हनुमान चालीसाचे पठण करुन आपल्यावरील संकट मुक्त झाले पाहिजे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात सर्वसामान्य जनता, बेरोजगारी, लोडशेडिंग, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दशा झाली आहे. यातून मुक्तता मिळवण्यासाठी आम्ही पाऊल उचलले होते. त्यात आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. १४ दिवस जेलमध्ये ठेवलं, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आता आम्ही स्वागत करेल की त्यांनी या कायद्यावर स्थगिती देण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने इंग्रजाांचा कायदा मोडून काढल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मोदी सरकारचा आम्हा गर्व आहे. ज्या प्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इंग्रजांच्या कायद्याचे पालन हनुमान चालीसा वाचणाऱ्यांवर करत असेल तर महाराष्ट्राचे हे दुर्भाग्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आणि दिलासा दिला आहे.


हेही वाचा : राजद्रोहाच्या कलमाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती