घरट्रेंडिंगशेअर बाजारात करोनाचा हाहाकार कायम

शेअर बाजारात करोनाचा हाहाकार कायम

Subscribe

सध्या शेअर बाजार ३२,३८४ अंशांवर आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेले काही दिवस शेअर बाजार गटांगळ्या खात आहे. दरम्यान, शुक्रवारी शेअर बाजार वधारला होता मात्र आज पुन्हा घसरला आहे. शेअर बाजार उघडताच निर्देशांक १७१८ अंशांनी पडला. निफ्टीमध्ये देखील ४७५ अंकांची घसरण झाली आहे. सध्या शेअर बाजार ३२,३८४ अंशांवर आहे.

- Advertisement -

करोनाचा विळख्यात आता आता सर्वच क्षेत्र येत आहेत. करोनाचा गंभीर परिणाम आता आर्थिक विकासावर दिसून येत आहे. गुरुवारी सकाळच्या सत्रातील पहिल्या मिनीटातच सहा लाख कोटींचे नुकसान झाले होते. मार्च २०१८ नंतर पहिल्यांदाच निफ्टी १० हजाराच्या खाली आला होता.

दरम्यान, भारतात करोनाग्रस्तांची संख्या ११० वर गेली आहे. याबाबतची अधिकृत माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या mohfw.gov.in यासंकेतस्थळावर देण्यात आली आहे. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वांत अधिक ३३ करोनाग्रस्त आहेत. दरम्यान, भारतात करोनाला आपत्ती घोषित करत साथरोग प्रतिबंध कायदा (Epidemic Diseases Act) लागू करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -