घरताज्या घडामोडीऑक्सिजनवर असतानाही कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर; पद्मश्री केके अग्रवाल यांचे कोरोनामुळे...

ऑक्सिजनवर असतानाही कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर; पद्मश्री केके अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन

Subscribe

देशभरात कोरोनाचे दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी कोरोना मृत्यूची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा फटका अनेक क्षेत्रातील लोकांना बसला आहे. काल सोमवारी मध्यरात्री १२ वाजता पद्मश्री पुरस्कृत इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA)डॉ. के.के अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन झाले, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. डॉ. अग्रवाल यांनी ६२ वर्षी अखेराचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते एम्स रुग्णालयातील ट्रामा सेंटरमध्ये होते. तसेच तीन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, डॉ. के.के अग्रवाल यांनी दोन महिन्यांपूर्वी लसीचे दोन्ही डोस घेऊन लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना एम्सच्या आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. के.के अग्रवाल यांनी स्वतः २८ एप्रिलला ट्वीट करून आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. जेव्हा ते डॉक्टर झाले, तेव्हा त्यांनी आपले जीवन लोकांना आणि आरोग्याबाबत जागरुकता करण्यासाठी समर्पित केले होते.

डॉ. के.के अग्रवाल यांची स्वतःचे एक युट्यूब चॅनेल होते. या युट्यूब चॅनलद्वारे कोरोना व्हायरससह इतर आजारांबाबत माहिती आणि सल्ला देत असतं. अग्रवाल हे व्यवसायाने लोकप्रिय होतेच, मात्र गोरगरीब रुग्णांना फ्रीमध्ये सेवा देणे आणि त्याच्या दिलदारपणामुळे लोकांना ते आवडत होते. कोरोनाच्या काळात रुग्णांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे होते. स्वतः ऑक्सिजनवर असतानाही कोरोना रुग्णांची सेवा करत असतं. अग्रवाल हे ह्रदयरोग तज्ज्ञ आणि भारतीय हार्ट केअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे प्रमुख होते. २०१० साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Mucormycosis: मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -