घरताज्या घडामोडीDrone Taxi : देशात लवकरच धावणार ड्रोन टॅक्सी

Drone Taxi : देशात लवकरच धावणार ड्रोन टॅक्सी

Subscribe

देशात आता लवकरच ड्रोन टॅक्सी (Drone Taxi) धावणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या ऑक्टोबरपासून देशभरात ड्रोन टॅक्सी धावण्यास सुरुवात होणार असल्याच दावा देशात ड्रोन बनवणाऱ्या एका कंपनीने केला आहे.

देशात आता लवकरच ड्रोन टॅक्सी (Drone Taxi) धावणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या ऑक्टोबरपासून देशभरात ड्रोन टॅक्सी धावण्यास सुरुवात होणार असल्याच दावा देशात ड्रोन बनवणाऱ्या एका कंपनीने केला आहे. या टॅक्सीत ड्रायव्हर व्यतिरिक्त एकच प्रवासी बसू शकतो. ही सुविधा उपलब्ध झाल्याने शहराच्या मध्यभागी हवेत उड्डाण करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे सहज शक्य होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यंदा दिल्ली (Delhi), मुंबईसह (Mumbai) देशातील 4 ते 5 शहरांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. आजपासून दिल्लीत सुरू झालेल्या इंडिया ड्रोन फेस्टिव्हलमध्ये ही ड्रोन टॅक्सी आकर्षणाचे मुख्य केंद्र होती. ही टॅक्सी रस्त्याऐवजी हवेत धावेल आणि प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी घेऊन जाईल, अशी माहिती ही टॅक्सी बनवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

- Advertisement -

राष्ट्रीय ड्रोन धोरण जाहीर

ड्रोन टॅक्सी सेवा यावर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू केली जाण्याची शक्यता असून, दिल्ली आणि मुंबईसारख्या मोजक्या ठिकाणांपासून याची सुरुवात केली जाणार असल्याचे समजते. सरकारने गेल्या वर्षीच राष्ट्रीय ड्रोन धोरण जाहीर केले होते, ज्यामध्ये भारतात प्रथमच ड्रोन टॅक्सींना मान्यता देण्यात आली होती. यासाठी संपूर्ण देशाची रेड, यलो आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

रेड झोनमध्ये ड्रोन टॅक्सींना परवानगी नसेल, तर यलो झोनमध्ये काही निर्बंधांसह परवानगी असेल. ग्रीन झोनमध्ये फिरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. राष्ट्रीय ड्रोन धोरणानुसार ड्रोन टॅक्सी हवेत 400 फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकणार आहे. कोणत्याही विमानतळाभोवती 12 किमीपर्यंत ड्रोन टॅक्सी चालवण्यास बंदी असेल.

- Advertisement -

हेही वाचा – लडाखमध्ये लष्करी जवानांची बस नदीत कोसळली; 7 जवान मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -