घर टेक-वेक एलॉन मस्क बनणार ट्विटरचे सीईओ, संचालक मंडळही बरखास्त

एलॉन मस्क बनणार ट्विटरचे सीईओ, संचालक मंडळही बरखास्त

Subscribe

सॅन फ्रॅन्सिस्को – ट्विटरची मालकी आल्यापासून एलॉन मस्क यांनी ट्विटरसंबंधी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यातच, त्यांनी आता संचालक मंडळही बरखास्त केले आहे. ट्विटरचे सर्व संचालक हटवून त्यांनी कंपनीची कमान आपल्या हातात घेतली आहे. तसंच, ट्विटरच्या सीईओचा कारभारही एलॉन मस्क आपल्या खांद्यावर घेणार आहेत. येत्या काळात एलॉन मस्क अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहेत.

हेही वाचा – बापरे! इन्स्टाग्राम अकाऊंट बंद होतायत; आता मेसेज पाठवण्यात येणार अडचणी

- Advertisement -

ट्विटक डील पूर्ण होताच एलॉन मस्क ट्विटरचे नवे बॉस बनले आहेत. ट्विटर खरेदी करताच ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना काढून टाकलं. तर, संचालक मंडळही आता बरखास्त केली आहे. ब्रेट टेलर, ओमिड कोर्डेस्टानी, डेविड रोसेनब्लैट, मार्था लेन फॉक्स, पैट्रिक पिचेट, एगॉन डरबन, फी फी ली आणि मिमी अलेमायेहौ यांना संचालकपदावरून हटवण्यात आलं आहे.

हेही वाचा व्हॉट्सअॅपवरून ‘या’ गोष्टी शेअर करताना सावधान, नाहीतर होऊ शकतो तुरुंगवास

- Advertisement -

व्हेरिफाईड केलेले ट्विटर अकाऊंट वापरकर्त्यांसाठीही एलॉन मस्क यांनी नियम बदलले आहेत. ब्लू टिक असणाऱ्यांसाठी सबस्क्रिप्शन प्लान जारी करण्यात येणार आहे. यासाठी वापरकर्त्यांना १६०० रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच, या सबस्क्रिप्शन प्लानमध्ये वापरकर्त्यांना अनेक नव्या सुविधाही देण्यात येणार आहेत.

हेही वाचा – ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची मोठी घोषणा; आणणार नवे अॅप्लिकेशन

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -