घरताज्या घडामोडीCovid-19 लशीचे दोन डोस घेतलेल्यांना विलगीकरण आणि कोरोना टेस्टची गरज नाही, तज्ज्ञांची...

Covid-19 लशीचे दोन डोस घेतलेल्यांना विलगीकरण आणि कोरोना टेस्टची गरज नाही, तज्ज्ञांची केंद्राला शिफारस

Subscribe

ज्या व्यक्तींनी कोरोना लशीचे दोन डोस घेतले असतील व त्यांना राज्यांतर्गेत प्रवास करायचा असेल तर कोरोना टेस्ट करण्याची त्यांना गरज नाही.

जर तुम्ही कोरोना विरोधी लशींचे दोन्ही डोस घेतले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण ज्या व्यक्तींनी कोरोना लशीचे दोन डोस घेतले असतील व त्यांना राज्यांतर्गेत प्रवास करायचा असेल तर कोरोना टेस्ट करण्याची त्यांना गरज नाही. त्याचबरोबर त्यांना विलगीकरणात राहण्याचीही आवश्यकता नाही. असा सल्ला कोवीड-१९ कोरोना लसीकरणासाठी तयार आलेल्या नॅशनल एक्सपर्टे ग्रुप (NEGVAC)आणि लसीकरणासाठी गठीत करण्यात आलेल्या टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप (NTAGI)ने आरोग्य मंत्रालयाला दिला आहे. नुकतीच आरोग्य मंत्रालयाबरोबर नॅशनल एक्सपर्टे ग्रुप आणि व्हेकसिन टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप यांची बैठक झाली. यावेळी दोन्ही समित्यांनी लशीचे दोन डोस घेतलेल्यांना विलगीकरण आणि कोरोना टेस्टची गरज नसल्याचे अहवालातील शिफारशींमध्ये नमुद केले आहे.

कोवीड -१९ वर्कींग ग्रुपचे चेअरमन डॉक्टर एन के अरोरा हे देखील या बैठकीस उपस्थित होते. यावेळी तज्त्रांनी केलेली ही शिफारस परदेशात जाणाऱ्यांसाठीही लागू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या शिफारशीत ज्यांना लशीचे दोन डोस घेण्याआधी कोवीड होऊन गेला आहे व ते बरे झाले आहेत किंवा त्यांच्यात सौम्य लक्षणे आहेत अशा व्यक्तीही देशांतर्गेत प्रवासादरम्यान विलगीकरण व कोरोना टेस्ट टाळू शकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. दरम्यान, या बैठकीतील कोरोना संदर्भातील सर्व मिनिट्स राज्यांना दिले असल्याचेही अरोरा यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्ती कोणत्या

पूर्ण लसीकरण म्हणजेच fully vaccinated या कॅटेगिरीत अशा व्यक्तींचा समावेश असेल ज्यांना लशीचा दुसरा डोस घेऊन कमीत कमी दोन आठवडे झाले आहेत. तज्ज्ञांनी या मार्गदर्शक सूचना नुकत्याच सार्वजनिक केल्या आहेत. पण असे असतानाही अनेक राज्यात पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींकडून RT-PCR रिपोर्ट मागितले जात आहेत. राज्यांच्या वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचनामुळे नागरिकांबरोबरच अनेक ट्रॅव्हल कंपन्यांची डोकेदुखी वाढली आहे. कारण अनेक राज्यांना या शिफारशींबद्दल महितच नाहीये. यामुळे केंद्रानेच आदेश काढून या मार्गदर्शक सूचना सार्वजनिक कराव्यात अशी मागणी ट्रॅव्हल कंपन्या करत आहेत.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -