घरदेश-विदेश'Show more', 'Show Less'; फेसबुकवर यासाठीही वापरता येईल हे फिचर

‘Show more’, ‘Show Less’; फेसबुकवर यासाठीही वापरता येईल हे फिचर

Subscribe

 

नवी दिल्लीः फेसबुकने आपल्या युजर्ससाठी ‘Show more’, ‘Show Less’ हे दोन नवीन फिचर्स आणणार आहे. याद्वारे युजर्स अधिक रिलस् बघू शकतात किंवा अधिक रिलस् दिसणे नाकारु शकतात. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

- Advertisement -

नवीन अपडेटनंतर हे रिलस् संबंधी फिचर कार्यरत होणार आहे. फेसबुकवर रिलस् अधिक बघितल्या जातात. रिलस् बघत असताना एखादी रिलस् आवडल्यास त्याविषयी असणाऱ्या अधिक रिलस् बघायच्या असल्यास Show more फिचरवर क्लिक करावे लागेल. जर अधिक रिलस् बघायच्या नसल्यास Show Less चा पर्याय असले. याद्वारे त्या कंटेटलाही फिडबॅक देता येणार आहे. सामान्य पोस्टसाठी हा पर्याय आधीपासूनच उपलब्ध होता. Facebook Watch मध्येही बदल करण्यात आले आहेत. येथे आता स्वतंत्रपणे Reels चा पर्याय दिसणार आहे. संगीत, व्हिडिओ आणि इतर गोष्टींमध्ये सहजपणे स्विच करता येणार आहे.

what’s app युजर्ससाठी मेटाने गेल्याच महिन्यात नवीन फिचर आणले. त्यामुळे व्हॉट्सऍपवर ठेवलेले स्टेटस आता फेसबुकवर (Facebook) शेअर करता येणार आहे. what’s app मध्ये मेटा कंपनीकडून नवीन फीचर अपडेट करण्यात आले आहे. what’s app आपल्या युजर्सना नेहमीच चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यात आता व्हॉट्सऍपमध्ये फेसबुक बटण देण्यात आले आहे. हे बटण माय स्टेटससह दिसत असलेल्या शेअर आयकॉनसह दिसेल. या बटणावर टॅप केल्यानंतर युजर्स आपले व्हॉट्सऍप स्टेटस आता फेसबुकवरही शेअर करू शकणार आहेत.

- Advertisement -

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरी फेसुबक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम हे ‘मेटा’ या एकाच कंपनीच्या मालकीचे आहेत. मेटाकडून इन्स्टाग्राम युजर्ससाठी त्यांची स्टोरी फेसबुकवर शेअर करण्याचा सोपा पर्याय देण्यता आला होता. असाच पर्याय आता व्हॉट्सअ‍ॅप स्टेटससाठीही उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सऍप स्टेटस प्रमाणेच आता फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टोरी देखील २४ तासांसाठी शेअर करता येणार आहे. व्हॉट्सऍपच्या नव्या सुविधेनुसार आता व्हॉट्सऍप स्टेटस आपोआप फेसबुकवर शेअर होणार आहे. यासाठी फेसबुक सेटिंगमध्ये एनॅबल हा पर्याय उपलब्ध होणार आहे. आपले सर्व सोशल प्लॅटफॉर्म्स परस्परांशी जोडण्याचा मेटाने प्रयत्न केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -