घरदेश-विदेशFarmers Protest: आंदोलक शेतकर्‍यांच्या घरवापसीच्या चर्चांवर राकेश टिकैत यांचे मोठं विधान, केला...

Farmers Protest: आंदोलक शेतकर्‍यांच्या घरवापसीच्या चर्चांवर राकेश टिकैत यांचे मोठं विधान, केला ‘हा’ दावा

Subscribe

Rakesh Tikait on Farmers Protest: मोदी सरकारचे तीन कृषी कायदा मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आत्ता दिल्लीच्या सीमेरेषेवरील शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केल्याची चर्चा सुरु झाली आहे. यातच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठं विधान केलं आहे. राकेश टिकैत यांनी सांगितले की, आंदोलन शेतकरी घरवापसी करत असल्याची अफवा पसरवली जात आहे. MSP कायदा आणि शेतकऱ्यांवर दाखल केलेले खटले मागे घेत नाही तोपर्यंत शेतकरी येथून हलणार नाहीत. याचपार्श्वभूमीवर ४ डिसेंबरला शेतकरी नेते आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये एक बैठक होणार आहे.

सोमवारी पार पडलेले संसदीय हिवाळी अधिवेशन ऐतिहासिक होते. कारण लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये कृषी कायदा रद्द करण्याचे विधेयक मंजूर झाले. मात्र आता राष्ट्रपतींची स्वाक्षरी म्हणजेच अंतिम मंजूरी मिळणे खूप महत्त्वाचे आहे. कारण राष्ट्रपतींनी यावर निर्णय घेत स्वाक्षरी केल्यास हे तीन कृषी कायदा विधेयक रद्द होणार आहे.

- Advertisement -

शेतकरी संघटना केवळ घोषणावर ऐकण्यास तयार नाहीत.

कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेनंतरही शेतकरी संघटना आंदोलन मागे घेणार की सुरु ठेवणार हे अद्याप निश्चित नाही. पंतप्रधान मोदींनी दहा दिवसांपूर्वी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर शेतकरी संघटना तीन कृषी कायदा रद्द करण्याचे विधेयक संसदेत सादर होण्याची वाट पाहत होते. यानंतर हिवाळी अधिवेशनात सोमवारी दोन्ही सभागृहांनी हे विधेयक रद्द करण्यास मान्यता दिली. मात्र कृषी कायदे रद्द करण्याबरोबरचं मोदींनी एमएसपी कायद्यासाठी एक कमिटी स्थापण करणार असल्याची घोषणा देखील केली होती. मात्र आंदोलक शेतकरी केवळ घोषणेवर समाधान मानू इच्छित नाहीत.

यापार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चा (SKM) ची बुधवारी म्हणजेच १ डिसेंबर रोजी शेतकरी आंदोलन सुरू ठेवणार की घरी परतण्याचा निर्णय घेणार याबाबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मात्र, राकेश टिकैत यांच्यासारख्या मोठ्या शेतकरी नेत्यांकडून किमान आधारभूत किंमत मिळवून देणारा एमएसपी (MSP) कायदा अंमलात आणावा अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -