घरटेक-वेकScram 411 : बाईक घेताय? मग, थोडं थांबा..फेब्रुवारी महिन्यात लाँच होतेय नवीन...

Scram 411 : बाईक घेताय? मग, थोडं थांबा..फेब्रुवारी महिन्यात लाँच होतेय नवीन Royal Enfield बाईक

Subscribe

बाईक चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...

नवीन वर्षात अॅडव्हेन्चर बाईक चाहत्यांसाठी एक आंनदाची बातमी आहे. देशाची प्रमुख बाईक निर्माता कंपनी ‘रॉयल इनफील्ड’ फेब्रुवारी महिन्यात बाईकचे काही प्रमुख मॉडल लॉंच करण्याची योजना आखत आहे. कंपनी ‘हिमालयन ADV’ चे सामान्यांच्या खिशाला परवडणारे मॉडेल लॉंच करणार आहे. जे फेब्रुवारी २०२२ मध्ये भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. कंपनीच्या या आगामी बाईकची छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झाली आहेत. Scram 411 चे सर्वात उल्लेखनीय डिझाइन वैशिष्ट्य हे त्याचे हिमालयन ADV-आधारित बाह्य डिझाइन असेल ज्यामध्ये काही प्रमुख फरक देखील पाहायला मिळतील.

 बाईकची कींमत कीती आहे ?

कंपनी १.९० लाख रुपयांच्या सुरूवातीच्या किंमतीत ही बाईक लाँच करू शकते.Royal Enfield Himalayan ची किंमत २.१० लाख ते २.१७ लाख रुपये  दरम्यान आहे. तर, स्क्रॅम 411 ची किंमत यापेक्षा १० ते १५ हजार रुपयांनी कमी असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

RE Scram 411 ला समोरचा मोठा विंडस्क्रीन, स्प्लिट सीट, स्टँडर्ड लगेज रॅक, मोठ्या पुढच्या चाकाऐवजी लहान चाके, कमी सस्पेंशन ट्रॅव्हल, सिंगल सीट आणि मागील पिलर ग्रॅब हँडल मिळतील. जे अधिक हायवे क्रूझिंग मशीन बनवण्यासाठी प्रभावी ठरेल.बाईकच्या पॉवरप्लांटची अद्याप पुष्टी झालेली नाही, परंतु LS410, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, ४-स्ट्रोक, SOHC इंजिनद्वारे ती चालविली जाईल अशी अपेक्षा आहे. ही मोटर २४.३ Bhp पॉवर आणि ३२ Nm पीक टॉर्क निर्माण करते आणि ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.

 

- Advertisement -

 हे ही वाचा – Mamata Banerjee Mumbai visit: ममता बॅनर्जी -शरद पवारांची भेट ठरली, मुख्यमंत्र्यांची भेट नाहीच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -