घरताज्या घडामोडीCorona Vaccine: रशियाच्या 'स्पुटनिक-व्ही'लसीचे वाचा वैशिष्ट्ये

Corona Vaccine: रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’लसीचे वाचा वैशिष्ट्ये

Subscribe

वर्षभरापासून जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यामुळे बऱ्याच महिन्यांपासून कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशातील वैज्ञानिक कोरोना लसीवर युद्धपातळीवर काम करत आहेत. आता काही कोरोना लस विकसित झाल्या असून अनेक देशात लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूच्या ‘कोविशील्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसींना आपात्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आज एकाबाजूला भारतात देखील कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच भारतात रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीचे लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज आपण रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ काही वैशिष्ट पाहणार आहोत.

११ ऑगस्ट २०२० रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जगातील पहिली लस विकसित केल्याचा दावा केला. तसेच व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीने ही जगातील पहिली लस घेतल्याची माहिती देखील त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. रशियाच्या गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटर आणि रशियन डायरेक्ट इनव्हेट्मेंट फंड यांच्याकडून ‘स्पुटनिक-व्ही’ लस विकसित करण्यात आली आहे. भारतात हैदराबादमध्ये स्थित असलेल्या कंपनी डॉ.रेड्डीज लॅबॉरटरी कंपनी ‘स्पुटनिक-व्ही’चे उत्पादन करत आहे. ‘स्पुटनिक-व्ही’ ही एक व्हुमन अ‍ॅडेनोव्हायरस लस (Human adenovirus vaccine) आहे.

- Advertisement -

यामुळे कोरोना लसीला ‘स्पुटनिक-व्ही’ असे दिले नाव

जगात सोव्हिएत रशियाने पहिल्यांदा १९५७ साली अमेरिकेच्या आधी ‘स्पुटनिक’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला. ज्यामुळे संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसला. त्याचप्रमाणे रशियाने कोरोना संकटकाळात देखील जगातील पहिला कोरोना लस विकसित केल्याचा दावा करून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले. रशियाने ‘स्पुटनिक’ या उपग्रहाच्या नावाने कोरोना लसीला ‘स्पुटनिक-व्ही’ नाव दिले आहे.

माहितीनुसार भारतात ‘स्पुटनिक-व्ही’ लस तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात १५०० नागरिकांना देण्यात येणार आहे. पण सध्या जगभरातील लोकांना असा प्रश्न पडला आहे की, जगात पहिल्यांदा कोरोना लस ‘स्पुटनिक-व्ही’ विकसित झाली. पण या लसीच्या अजूनही भारतात चाचण्या सुरू का आहेत? याचे कारण म्हणजे लस विकसित करताना काळजीपूर्व करावी लागते आणि पूर्णपणे त्याच्या चाचण्या कराव्या लागतात. दरम्यान काही वेळेला ‘स्पुटनिक-व्ही’लसीच्या मानवी चाचण्यातील टप्प्यात अडथळे आले. त्यामुळे ‘स्पुटनिक-व्ही’ चाचण्यांना थोडा उशीरा होत आहे, असे म्हटले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भारतात स्पूटनिक-वी लसीच्या तिसऱ्या ट्रायला हिरवा कंदील


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -