घरदेश-विदेशअसदुद्दीन ओवैसींच्या दिल्लीतील घरावर हल्ला, हिंदू सेनेच्या पाच जणांना अटक

असदुद्दीन ओवैसींच्या दिल्लीतील घरावर हल्ला, हिंदू सेनेच्या पाच जणांना अटक

Subscribe

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या दिल्लीतील शासकीय घराची मंगळवारी काही जणांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची जबाबदारी हिंदू सेनेने एक निवेदन जाहीर करत घेतली आहे. यानंतर पोलिसांनी हिंदू सेनेच्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

ओवैसींनी केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्यांमुळे संतप्त झालेल्या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ओवैसींच्या घराबाहेर जाऊन निदर्शने केली तसेच घराबाहेरील मोठ्याप्रमाणात तोडफोड केली. हिंदू सेनेचे कार्यकर्ते खासदार ओवैसींच्या अशोक रोडवरील बंगला क्रमांक ३४ वर पोहोचले होते. कार्यकर्त्यांनी ओवैसींविरोधात घोषणाबाजी करत तोडफोड सुरू केली. यावेळी त्यांनी गेटवरील नेम प्लेट्स आणि दिवे तोडले. तर घराच्या खिडक्यांचेही मोठे नुकसान केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सध्या पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. अटक करण्यात आलेले सर्व संशयित आरोपी पूर्वेतकडील मंडोली भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेवेळी ओवैसी या निवासस्थानी नव्हते.

- Advertisement -

मात्र या घटनेची संसद मार्ग पोलीसांनी संपूर्ण माहिती घेता आता तपास सुरु केला आहे. या घटनेदरम्यान हिंदू सेनेचे प्रदेशाध्यक्ष ललित कुमार यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. ज्यात त्यांनी सभांमध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी प्रक्षोभक आणि हिंदूविरोधी वक्तव्य करू नयेत, असं आवाहन केले आहे. ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी नेहमी आपल्या भाषणांमध्ये किंवा सभांमध्य हिंदू आणि हिंदू देव आणि देवतांविरोधात प्रक्षोभक वक्तव्ये करत असतात.

खासदारांचचं घर सुरक्षित नसेल तर सामान्यांचं काय? ओवैसींची प्रतिक्रिया

या हल्ल्यानंतर ओवैसींना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ओवैसी म्हणाले की, काही गुंडांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थावर हल्ला केला. असे भ्याड हल्ले ते करतच असतात, कारण ते कायम झुंडीने फिरतात. ते घरी नसताना हा हल्ला झाला. या हल्लेखोरांच्या हातात कुऱ्हाडी, लाठ्याकाठ्या होत्या. गुडांनी नेम प्लेट तोडली, घरावर दगडफेक केली. तसेच ४० वर्षांपासून काम करणाऱ्या राजूला मारहाण करत धार्मिक घोषणा दिल्या गेल्या. जवळपास १३ जणांनी हल्ला केला असून ६ जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस त्यांच्यावर कठोर कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधानांचं निवासस्थान फक्त ८ मिनिटांच्या अंतरावर आहे. तरीही आपल्या निवासस्थानाला लक्ष्य केलं जात आहे. याबद्दल पोलिसांना अनेकदा सांगितलं. खासदारांचचं घर सुरक्षित नसेल तर सामान्यांचं काय? असा सवाल ओवैसींनी केला आहे.

- Advertisement -


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -