घरदेश-विदेशआज पासून बदलणार 'हे' पाच नियम

आज पासून बदलणार ‘हे’ पाच नियम

Subscribe

केंद्र सरकाराने बँकिंग किंवा इतर श्रेत्रांमधील नियमांमध्ये बदल केले होते. हे नियम १ डिसेंबर म्हणजेच आज पासूनच सुरु केले जाणार आहेत.

केंद्र सरकारने १ डिसेंबर पासून पाच नियम बदलणार आहे. या नियमांमध्ये केलेल्या बदलावाचा सामान्य नागरिकांना फटका बसणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आणि पेंशनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदललेल्या नियामांची माहिती बहुतांश लोकांना नाही. केंद्रसराकरने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने ही आपले नियम बदलले आहेत.

नाही मिळणार नेट बँकिस सेवा

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व खातेदारांना आपला मोबाईल नंबर रजिस्टर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मोबाईल नंबर रजिस्टर नसलेल्या खातेदारांना मोबाईल बँकिंग सेवा वापरता येणार नाही. मोबाईल नंबर रजिस्टर करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर पर्यंत होती. ज्या खाते दारांनी मोबाईल क्रमांक रजिस्टर केला नाही त्यांच्यासाठी मोबाईल बँकिंगची सेवा बंद झाली.

- Advertisement -

एसबीआय बडी झाले बंद

एसबीआयच्या दुसऱ्या बदललेल्या नियमानुसार एसबीआय बडी हे अॅप बंद करण्यात आले आहे. याजागी आता एसबीआय योनो हे अॅप काम करेल. जर तुम्ही एसबीआय बडी मध्ये पैसे टाकले असतील तर तुमचे पैसे काढून घ्या.

पेंशनर खाते धारकांचेही निमय बदलले 

पेंशन मिळत असलेल्या खाते धराकांसाठीही नियम बदलले गेले आहे. १ नोव्हेंबर पासून ते ३० नोव्हेंबर पर्यत या खातेदारांनी संबधित सर्टफिकेट बँकेत जमा करणे आवश्यक आहे. ज्या खातेदारांनी हे सर्टफिकेट जमा न केलेनाही त्यांचे खाते आज पासून बंद करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

भरावी लागणार लोन प्रोसेसिंग फी 

केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सरक्षण विभागांकडून पेंशन मिळणारे ७६ वर्षांपर्यंतच्या खातेदारांनी लोन घेतल्यास त्यांना लोन प्रोसेसिंग फी भरावी लागणार आहे. फेस्टीवल ऑफर अंतर्गत ३० डिसेंबर पर्यंत फी न घेण्याचे आदेश बँकेला देण्यात आले आहेत.

ड्रोन उडवणे कायदेशीर 

देशात ड्रो उडवणे आता कायदेशीर झाले आहे. सरकारने ठरवून दिलेल्या जागेवर तुम्ही ड्रोन उडवू शकणार आहात. ड्रोन उडवणाऱ्यांना लायसन्स काढून कायेदशीर रित्या ड्रोन उडवण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -