फ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा

बिन्नी बिन्साल यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप झाले होते. त्यांनी ते सर्व आरोप फेटाळले आहेत.

Flipkart CEO Binny Bansal resigned
फ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा

फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी दोघांनी मिळून फ्लिपकार्ट कंपनीची स्थापना केली होती. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी वॉलमार्ट कंपनीला फ्लिपकार्ट कंपनी विकली. सचिन बिन्साल यांनी फ्लिपकार्टच्या विक्रिच्या वेळीच राजीनामा दिला होता. आता सहा महिन्यांनंतर बिन्नी बिन्साल यांनीही तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा – फ्लिपकार्टला ३२०० कोटींचा फटका

का दिला राजीनामा?

बिन्नी बिन्साल यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप झाला होता. त्यांनी तो आरोप फेटाळले आहेत. त्यानंतर वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट कंपनीकडून त्यांची चौकशी करण्यात आली. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गैरवर्तणुकीच्या गंभीर आरोपानंतर फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट कंपनीकून झालेल्या चौकशीनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा – वॉलमार्टच्या फ्लिपकार्ट खरेदीच्या विरोधात लहान व्यापाऱ्यांचं आंदोलन

वॉलमार्ट काय म्हणाले?

दरम्यान याप्रकरणी वॉलमार्ट कंपनीने आपले मत स्पष्ट केले आहे. बिन्नी बन्सल यांनी फ्लिपकार्ट समूहाच्या सीईओ पदाचा राजीनामा दिल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्याचबरोबर अलीकडच्या घटनानंतर त्यांनी हा राजीनामा दिल्याचे वॉलमार्टने सांगितले आहे.


हेही वाचा – Flipkart कडून पुन्हा एकदा फसवणूक