घरट्रेंडिंगFlipkart कडून पुन्हा एकदा फसवणूक !

Flipkart कडून पुन्हा एकदा फसवणूक !

Subscribe

फ्लिपकार्टवरुन मागवली होती २० सोन्याची नाणी, मात्र ग्राहकाच्या हाती आला केवळ रिकामा बॉक्स.

गेल्या काही वर्षात ऑनलाईन शॉपिंग करण्याचं प्रमाण जगभरातील लोकांमध्ये अधिकच वाढलं आहे. ई-कॉमर्स साईटवरुन शॉपिंग करण्याकडे भारतीय ग्राहकांचा कल वाढतो आहे. ऑनलाईन खरेदीला लोकांची भरभरुन पसंती मिळत असली तरीही, याठिकाणी फसवणूक होण्याची प्रकरणं देखील तितकीच आहेत. आजवर अॉनलाईन खरेदीमध्ये ग्राहक फसवले गेल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. बंगळुरुमधील अमित घार्ग यांच्यासोबतही नुकताच असा प्रकार घडला आहे. अमित यांनी डिसेंबर महिन्यात २० सोन्याची नाणी मागवली होती. या नाण्यांसाठी त्यांनी तब्बल ६१ हजार रुपये मोजले होते. मात्र, प्रत्यक्षात डिलीव्हरीच्यावेळी त्यांच्याकडे फक्त रिकामा बॉक्सच आला. इतके पैसे मोजून मागवलेल्या मौल्यवान नाण्यांच्या जागी केवळ रिकामा बॉक्स आल्यामुळे अमित यांची चांगलीच निराशा झाली.

अखेर पोलिसात तक्रार दाखल…

दरम्यान या फसवणुकीबाबत अमित यांनी ईमेलद्वारे फ्लिपकार्ट कंपनीकडे तक्रार नोंदवली होती. मात्र, अनेक दिवस फॉलोअप घेऊनही त्यांना फ्लिपकार्टकडून त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अखेर याप्रकरणी अमित यांनी नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रा नोंदवली. सध्या या प्रकरणी पुढील चौकशी सुरु असल्याचं बंगळुरु पोलिसांनी सांगितलं आहे. अमित यांनी मागवलेली सोन्याची नाणी नेमकी गेली कुठे? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. फ्लिपकार्ट कंपनीकडून ही नाणी पाठवण्यातच आली नाही की मध्येच ती नाणी कुणी गहाळ केली, याचा बंगळुरु पोलीस सध्या तपास घेत आहेत. याआधीही फ्लिपकार्टसह अन्य काही ई-कॉमर्स साईट्सकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -