घरदेश-विदेशबिहारमध्ये 24 ऑगस्टला होणार फ्लोअर टेस्ट, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

बिहारमध्ये 24 ऑगस्टला होणार फ्लोअर टेस्ट, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Subscribe

बिहारमध्ये 24 ऑगस्टला फ्लोअर टेस्ट होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे.

बिहारमध्ये आज नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. या मंत्रिमंडळ बैठकीत 24 ऑगस्टला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अधिवेशन 24 आणि 25 ऑगस्टला होणार आहे.

बिहारमधील राजभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाला फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये आरजेडी, जेडीयू, काँग्रेस, हम आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे.

- Advertisement -

बंपर रोजगार योजना – 

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरच मोठी घोषणा केली आहे. येत्या महिन्यात राज्यातील गरीब आणि तरुणांना बंपर रोजगार दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले.

- Advertisement -

बिहारमध्ये काय घडले –

नितीश कुमार यांनी सोमवारी भाजपसोबतची युती तोडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. नितीश कुमार यांनी भाजपवर जेडीयूचा अपमान करत स्वत:च्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला होता. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. यानंतर महागठबंधनची बैठक झाली. ज्यामध्ये नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्यात आली. महागठबंधनच्या बैठकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -