घरोघरी वाटण्यात आलेल्या झेंड्यांमध्ये गंभीर चुका; झेंडे पुरवठादारावर कारवाईची पेडणेकरांची मागणी

झेंडे पुरवठादारावर पालिकेकडून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर(kishori pednekar) यांनी मुबई महानगर पालिकेचे(bmc) आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे.

kishori pednekar

मुंबई, १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देश भारतच साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कडून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘हर घर तिरंगा'(har ghar tiranga) हा उपक्रम सुद्धा देशभरात राबविण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मुंबई महापालिकेकडून लाखो झेंड्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यासाठी पालिका ७ कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र घरोघरी वाटप करण्यात येत असलेलया झेंड्यामध्ये काही गंभीर त्रुटी आढळलया आहेत. त्यामुळे याप्रकरणी जबाबदार झेंडे पुरवठादारावर पालिकेकडून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर(kishori pednekar) यांनी मुबई महानगर पालिकेचे(bmc) आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे.

हे ही वाचा –  ‘हर घर तिरंगा’ अभियानाचं नवं गाणं; आशा भोसले, सोनू निगम, अमिताभ बच्चन यांचा स्वरसाज

दरम्यान याप्रकरणी माजी महापौर पेडणेकर यांनी पालिका आयुक्त चहल यांची बुधवारी पालिका मुख्यालयात जाऊन भेट घेतली. त्यावेळी किशोरी पेडणेकर(kishori pednekar) यांच्या सोबत शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ आणि ऍड भावीन सावला सुद्धा उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवा निमित्त केंद्र सरकारच्या आदेशाने घरोघरी तिरंगा झेंडे लावण्यात येणार आहेत. मुंबई महापालिका त्यासाठी ७ कोटी रुपये खर्चणार आहे. झेंडे पुरवठदाराने पालिकेला १० लाखांपेक्षाही जास्त झेंड्यांचा पुरवठा आतापर्यंत केला आहे. मात्र सदर झेंडे सदोष व ध्वज संहितेचे उल्लंघन करणारे आहेत. अनेक झेंड्याचा आकार हा आयताकृती नाही. झेंड्यातील तीन रंग एकसमान आकाराचे नाहीत. झेंड्यामधील अशोक चक्र हे अंडाकृती स्वरूपाचे दिसते. त्यामुळे झेंडे पुरवठादाराने पालिकेला सदोष व निकृष्ट दर्जाचे झेंडे पुरवले आहेत.

हे ही वाचा –  भाजपच्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी चीनमधून झेंड्यांची आयात; नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

त्यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेने या गंभीर बाबीकडे लक्ष न देता त्याच निकृष्ट स्वरूपाच्या झेंड्यांचे वाटप केले आहे. मात्र असे हे तिरंगा झेंडे आम्ही घरांवर लावल्याने ध्वजसंहितेचा अवमान होणार आहे. आम्हाला राष्ट्रध्वजाचा आदर आणि अभिमान आहे. त्यामुळे असे निकृष्ट आणि सदोष राष्ट्रध्वज आम्ही घरांवर लावू शकत नाही, अशी तक्रार माजी महापौर किशोरी पेडणेकर(kishori pednekar) यांनी आयुक्तांकडे केली आहे. त्याचप्रमाणे निकृष्ट व सदोष झेंड्यांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारावर पालिकेने कडक कारवाई करावी अशी मागणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महानगरपालिका(bmc) आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे.

हे ही वाचा – हर घर तिरंगा! सोशल मीडिया डीपीवर तिरंगा न ठेवल्याने टीका; आरएसएसने दिले उत्तर