घरदेश-विदेशमाझ्यासाठी कालीचा अर्थ मांसाहार आणि मद्यपान स्वीकार करणारी देवी... महुआ मोइत्रा यांचं...

माझ्यासाठी कालीचा अर्थ मांसाहार आणि मद्यपान स्वीकार करणारी देवी… महुआ मोइत्रा यांचं ट्वीट

Subscribe

महुआ मोइत्रा मंगळवारी म्हणाल्या होत्या की, "कालीची अनेक रूपं आहेत. माझ्यासाठी कालीचा अर्थ मांसाहार आणि मद्यपान स्वीकार करणारी देवी असा आहे". तसेच त्या पुढे म्हणाल्या होत्या की, "हे तुमच्यावर अवलंबून आहे की, तुम्ही आपल्या आराध्य देवतेला कसे पाहता

काली चित्रपटावरून सध्या भारतात अनेक वाद-विवाद सुरू झाले आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत, तर दुसरीकडे भाजप आणि इतर हिंदू संघटना त्यांच्या वक्तव्याचा प्रचंड विरोध करत आहेत. यादरम्यान, महुआ मोइत्रा यांनी एक ट्वीट शेअर करत वादाच्या आगीमध्ये तेल ओतले.

- Advertisement -

खासदार महुआ मोइत्रा यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर ट्वीट करत लिहिलंय की, “मला अशा भारतात नाही राहायचं, जिथे भाजप पक्षाचे पितृसत्तात्मक ब्राह्मणवादी विचार असतील आणि हेच विचार इतर धर्मांच्या आसपासही फिरतील. मी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मतावर ठाम राहणार. तुम्ही तुमची तक्रार नोंदवा, मी तुम्हाला कोर्टात भेटेन.

महुआ मोइत्राच्या या विधानामुळे चिघळला वाद

- Advertisement -

महुआ मोइत्रा मंगळवारी म्हणाल्या होत्या की, “कालीची अनेक रूपं आहेत. माझ्यासाठी कालीचा अर्थ मांसाहार आणि मद्यपान स्वीकार करणारी देवी असा आहे”. तसेच त्या पुढे म्हणाल्या होत्या की, “हे तुमच्यावर अवलंबून आहे की, तुम्ही आपल्या आराध्य देवतेला कसे पाहता. जर तुम्ही भूतान किंवा सिक्किम येथे गेलात तर , तिथे देवाला पूजेमध्ये व्हिस्की चढवली जाते. याशिवाय जर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये कोणाला प्रसाद म्हणून व्हिस्की दिली तर त्या व्यक्तिच्या भावनांचा अनादर होतो. माझ्यासाठी काली ही एक मांसाहार खाणारी आणि मद्यपान करणारी देवी आहे. देवी कालीची अनेक रूपे आहेत”.

महुआ मोइत्राच्या वक्तव्यावर शशि थरूर यांचे समर्थन
महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यावर त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने विरोध केला आहे, मात्र काँग्रेस नेता शशि थरूर यांनी महुआ मोइत्रा यांचे समर्थन केलेलं आहे. शशि थरूर म्हणाले की, “महुआ मोइत्रा यांच्यावर होणारे हल्ले पाहून मी हैराण झालो आहे. हिंदू लोकांना माहित आहे की, प्रत्येक ठिकाणी पूजा करण्याची परंपरा वेग-वेगळी आहे. देवीला कोण काय चढवतं, हे फक्त त्याच भक्ताला ठाऊक असतं. आम्ही सध्या अशा परिस्थितीत आहे की, जर एखाद्या ठिकाणी कोणाबद्दल काही म्हणालो की, तिथे कोणाच्या ना कोणाच्या भावना दुखावल्या जातात.मात्र महुआ मोइत्रा यांनी कोणाच्या भावना दुखवण्यासाठी असं वक्तव्य केलं नव्हतं. मी सर्वांना विनंती करतो की, हे वातावरण आता शांत करा. धर्माला कोण कशाप्रकारे मानतो, हे भक्तावर सोडून द्या”.


हेही वाचा :लालू प्रसाद यादव यांची एअरपोर्टवर तब्येत बिघडली, उपचारांसाठी AIIMS रुग्णालयात दाखल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -