लालू प्रसाद यादव यांची एअरपोर्टवर तब्येत बिघडली, उपचारांसाठी AIIMS रुग्णालयात दाखल

लालू प्रसाद यादव यांना मंगळवारी रात्री ९ वाजच्या सुमारास एम्स रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर योग्य उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

lalu prasad yadav may be released from jail today got bail in doranda case
Lalu Yadav Bail : लालूप्रसाद यादव यांचा सुटकेचा आदेश जारी; CBI कोर्टात 10 लाखांचा दंड जमा

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची मंगळवारी दिल्ली एअरपोर्टवर अचानक तब्येत बिघडली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना रांचीच्या रिम्स रुग्णालयातून एअर अँब्युलन्सने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी रात्री त्यांनी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे त्यांच्यावर योग्य उपचार करुन बुधवारी सकाळी जवळपास ३:४५ वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

ANI ने दिल्ल्या माहितीनुसार,  लालू प्रसाद यादव यांना मंगळवारी रात्री ९ वाजच्या सुमारास एम्स रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर योग्य उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्यात तोवर ते डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली राहतील.

मिळालेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रिम्स रुग्णालयात नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर चांगले उपचार करण्यासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. एअर अँब्युलन्सने त्यांना दिल्लीला आणले गेले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी मीसा भारती होती. वडिलांची तब्येत बिघडल्याचे कळताच ती तात्काळ रांची येथे पोहोचली. रिम्स रुग्णालयात त्यांच्यावर योग्य उपचार सुरू होते परंतु त्यांना परत नेत असताना पुन्हा त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले.

रिम्सच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लालू प्रसाद यादव यांची किडणी सातत्याने खराब होत आहे. त्याचप्रमाणे लालू प्रसाद यांना डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, ह्रदयरोग, दातांचे दुखणे, उजवा खांदा आणि पायांच्या हाडांची देखील समस्या आहे. तसेच त्यांना डोळ्यांनी दिसणे देखील कमी होऊ लागले आहे.


हेही वाचा – पंजाबमध्ये भ्रष्टाचारविरोधात हेल्पलाईन जारी, थेट मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे तक्रार करता येणार