Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Breaking : पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, अज्ञातस्थळी हलवले

Breaking : पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, अज्ञातस्थळी हलवले

Subscribe

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत होते.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत होते. पण आज (ता. 09 मे) इस्लामाबाद न्यायालयाच्या बाहेर येताच त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पाकिस्तान वृत्तपत्र डॉनकडून देण्यात आली आहे. (Former Pakistan Prime Minister Imran Khan arrested ) गेल्या अनेक महिन्यांपासून तोशखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Ex PM Imran Khan) यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार होती. पण आज अखेरीस जेव्हा ते इस्लामाबादच्या न्यायालयाबाहेर दाखल झाले, त्यावेळी त्यांना लगेच पाकिस्तानी रेंजर्सकडून अटक करण्यात आले. अल कादीरा ट्रस्ट प्रकरणा त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानचे आयजी अकबर नासीर खान यांनी दिली आहे.

- Advertisement -

या घटनेनंतर पाकिस्तानात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तोशखाना प्रकरण आणि पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात गेल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. याच प्रकरणी इम्रान खान याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. इम्रान यांना अटक होताच पाकिस्तानातील समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर त्यांच्यासोबत चुकीचे घडत असल्याचे PTI (पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ) च्या नेत्यांकडून ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. तर PTI ने काही व्हिडीओ ट्वीट केले असून यामध्ये इम्रान खान याच्या वकिलाला जबर मारहाण करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

इम्रान खान यांना अटक होताच इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इम्रान यांना कोणत्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे, याबाबतची माहिती कोर्टात येऊन देण्यात यावी, असे निर्देश न्यायाधीशांकडून देण्यात आली आहे. तर अटक होण्याच्या काही तास आधी इम्रान खान यांनी व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी मी अटक होण्यासाठी तयार आहे. फक्त अटक वॉरंट घेऊन याय यासाठी देशाचा पैसा खर्च करू नका किंवा लष्करही आणू नका, असे या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी सांगितले होते. इस्लामाबादमध्ये मी येताच कोणतेही नाट्य करण्याची गरज नाहीये, त्यामुळे मी अटकेची माझी मानसिक तयारी करून आलो आहे, असेही ते या व्हिडीओच्या माध्यमातून म्हणाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये ते त्यांच्यावर एकही केस नसल्याचा दावा करत आहेत. पण त्यांच्यावर 108 प्रकरणांध्ये केस दाखल असून यांतील चार प्रकरणात त्यांची अटक निश्चित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -