घरताज्या घडामोडीनुसरत मिर्झा भेटीप्रकरणी हमीद अन्सारींनी केला खुलासा, म्हणाले नियमानुसार...

नुसरत मिर्झा भेटीप्रकरणी हमीद अन्सारींनी केला खुलासा, म्हणाले नियमानुसार…

Subscribe

अन्सारी यांनी त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांना पाच वेळा भारतात बोलावले होते आणि त्यांना गुप्तचर माहिती शेअर केल्याचा आरोप भाजपने केला होता.

काँग्रेसचे नेते आणि माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. अन्सारी यांनी त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांना पाच वेळा भारतात बोलावले होते आणि त्यांना गुप्तचर माहिती शेअर केल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, हा आरोप हामिद अन्सारी यांनी फेटाळून लावला आहे. पत्रकार परिषदेत परदेशी पत्रकारांना बोलवण्याचा अधिकार सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयांना असतो, असं हामिद अन्सारी म्हणाले. (Former Vice President Hamid Ansari Clarification On Pakistani Journalist Nusrat Mirza)

११ डिसेंबर २०१० मध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. नियमांनुसार आयोजकांनी पाहुण्यांची लिस्ट तयार केली होती. त्यामुळे मी कोणालाही बोलावले नव्हते, असं हामिद अन्सारी म्हणाले आहेत.

- Advertisement -

हामिद अन्सारी इराणमधील भारतीय राजदूत असताना दहशतवादावरील पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांना बोलावून त्यांना राष्ट्रीय सुरक्षेची माहिती पुरवून देशाशी गद्दारी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या आरोपावर प्रत्युत्तर देताना हामिद अन्सारी म्हणाले की, उपराष्ट्रपतींच्या कोणत्याही कार्यक्रमात परदेशी पाहुण्यांना सरकारच्या सल्ल्यानंतर बोलावले जाते. परदेशी पाहुण्यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत आमंत्रित केले जाते.

अन्सारी म्हणाले की, इराणमधील भारताच्या राजदूताचे काम सरकारकडे नोंद केले आहे. मी देशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. इराणमधील माझा कार्यकाळ रेकॉर्डवर आहे. यानंतर मला न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचा स्थायी सदस्य बनवण्यात आले. माझ्या कामाचे देशात आणि जगात कौतुक झाले आहे, असंही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -