घरताज्या घडामोडीFort building collapse Live Update: दुर्घटनेत १० जणांचे बळी; एकाची प्रकृती चिंताजनक

Fort building collapse Live Update: दुर्घटनेत १० जणांचे बळी; एकाची प्रकृती चिंताजनक

Subscribe

फोर्ट येथील भानुशाली इमारतीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे. काल रात्रीपर्यंत २ जणांचे मृत्यू झाले होते. पण जे.जे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या आणखी ७ जणांचे मृत्यू शुक्रवारी झाले. रात्री मध्यरात्री पर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. दरम्यान, या इमारतीचे भराव काळजीपूर्वक बाजूला करण्यात येत आहे. यानंतर शेजारच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ती इमारत धोकादायक असल्यास ती इमारतही पाडली जाईल अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईतील फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख व जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी केली. तसेच इमारतीचे काम पुर्ण होईपर्यंत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्या वतिने करण्याची ग्वाही अस्लम शेख यांनी दिली आहे.

- Advertisement -

फोर्ट येथील जीपीओ कार्यालया समोरील भानुदास ही इमारत गुरुवारी दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास कोसळून झालेल्या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक रहिवाशी अडकले होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्याना शोधून बाहेर काढण्याचे काम मुंबई अग्निशमन दल, एनडीआरएफच्या जवानांसह आणखी कोणी तरी करत होते. आणखी कोणी म्हणजे एनडीआरएफ श्वान या सर्वांना मदत करत होता. या श्वानाच्या मदतीने अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात आले. दुर्दैवाने या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांच्या बरोबरीने काम करणाऱ्या श्वानाला बघून अनेकांना त्याचे कौतुक वाटत होते.

एनडीआरएफ श्वान

मुंबईतील फोर्ट परिसरातील भानुशाली या पाच मजली रहिवाशी इमारतीचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी आहेत.

- Advertisement -


फोर्ट इमारत दुर्घटनेत अजून एकाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे आता एकूण मृतांची संख्या ७ झाली आहे.


फोर्ट परिसरात कोसळलेल्या इमारतीच्या भागाचा ढिगारा साफ करण्यात आला आहे. एनडीआरएफचे प्रभारी आशिष कुमार येथे कार्यरत आहेत. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.


ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना शोधण्यासाठी एनडीआरएफकडून श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे. शेरु आणि उदय हे दोव श्वान बचावकार्यात मदत करत आहेत.


मुंबईतील फोर्ट परिसरातील भानुशाली या पाच मजली रहिवाशी इमारतीचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २३ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -