घरदेश-विदेशफ्रान्समध्ये अनोखी कोरोना टेस्ट; सिगारेटमधील निकोटीनचा उपचारासाठी वापर!

फ्रान्समध्ये अनोखी कोरोना टेस्ट; सिगारेटमधील निकोटीनचा उपचारासाठी वापर!

Subscribe

संशोधनानुसार सिगारेटमधील निकोटीन हा घटक लोकांना कोरोना व्हायरसपासून वाचवू शकतो.

फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार सिगारेटमधील निकोटीन हा घटक लोकांना कोरोना व्हायरसपासून वाचवू शकतो. पॅरिसच्या एका हॉस्पिटलमधील संशोधकांनी कोरोनो व्हायरसच्या ३४३ रुग्णांची तपासणी केली, त्यापैकी १३९ लोकांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे आढळून आले. संशोधक कार्यात सहभागी असणाऱ्या अमौरा यांनी असे सांगितले की, यापैकी केवळ पाच टक्के लोकांनाच धूम्रपानचे व्यसन होते. गेल्या महिन्यात इंग्लंडच्या एका जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, चीनमध्ये कोरोना संकटामध्ये सापडलेल्या हजारो लोकांपैकी १२.६ टक्के लोकं धु्म्रपान करत होते. डब्ल्यूएचओच्या मते, चीनमधील रूग्णांची संख्या धूम्रपान करणार्‍या व्यक्तींपेक्षा कमी आहे.


Corona: दिल्लीत कोरोनाचा कहर; कोरोना रूग्णांचा आकडा २३०० पार!


संशोधनानुसार, निकोटीन हा घटक कोरोना व्हायरसला पेशींमध्ये पोहोचण्यापासून रोखू शकतो, त्यामुळे शरीरात व्हायरस पसरण्यापासून प्रतिबंधित होण्यास मदत होते. त्यामुळे संशोधक त्यांच्या क्लिनिकल चाचणीसाठी फ्रान्सच्या आरोग्य विभागाकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत. तसेच ज्या ठिकाणाहून या संशोधनाची सुरूवात झाली होती, त्या ठिकाणीच पॅरिसमधील पीटी सलपेट्रिअर हॉस्पिटलच्या रूग्णांवर निकोटीन पॅचचा वापर करण्याचा विचार देखील ते करत आहेत.

- Advertisement -

निकोटीन कोरोनाशी लढा देऊ शकते पण…

रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांच्या शरीरावर अशा प्रकारचे उपचार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. जेणेकरून त्यांना त्याचे परिणाम जवळून जाणून घेता येतील. संशोधकांनी हे स्पष्ट केले आहे की, त्यांच्या या संशोधनाचा हेतू लोकांना धूम्रपान करण्यास प्रोत्साहित करणे असा अजिबात नाही. सिगारेटमध्ये आढळणारे निकोटीन कोरोना व्हायरसशी लढा देऊ शकते, परंतु निकोटीन हा घटक शरीरासाठी घातक ठरतो.

२१ हजारांहून अधिकांचा कोरोनाने घेतला बळी

मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी फ्रान्समध्ये तंबाखूमुळे सर्वाधिक मृत्यू झाला आहे. तेथे धुम्रपान करण्याचे व्यसन असल्याने सुमारे ७५ हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त कहर झालेल्या युरोपियन देशांमध्ये फ्रान्स हा एक देश आहे. यामुळे फ्रान्समध्ये आतापर्यंत २१ हजारांहून अधिक लोक कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. तर सुमारे दीड लाखांहून अधिकांना कोरोना संसर्ग झाल्याची नोंद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -