घरक्राइम'ती' कारच्या चाकाखाली अडकलीय हे ड्रायव्हरला माहीत होते; दिल्ली दुर्घटनेची धक्कादायक माहिती उघड

‘ती’ कारच्या चाकाखाली अडकलीय हे ड्रायव्हरला माहीत होते; दिल्ली दुर्घटनेची धक्कादायक माहिती उघड

Subscribe

दिल्लीच्या सुल्तानापुरीमध्ये झालेल्या तरुणीच्या अपघाती मृत्यू प्रकरणी आता एक मोठा खुलासा झाला आहे. ज्यावेळी कारने तरुणीच्या स्कूटीला टक्कर धडक दिली, त्यावेळी तरुणी स्कूटीवर एकटी नव्हती तर तिच्यासोबत तिची मैत्रीण देखील होती. मृत तरुणीच्या मैत्रिणीचा जबाब आता समोर आला आहे. पीडितेच्या मैत्रिणीने आज मीडियासमोर सांगितले की, त्या कारमधील लोकांना एक 20 वर्षीय तरुणी त्यांच्या कारच्या चाकाखाली आली आहे माहीत होते, मात्र तरीही त्यांनी यू- टर्न घेत न थांबता तरुणीस 13 किमीपर्यंत फरफटत नेले. ज्यात तिचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या तपासात समोर आले की, मृत तरुणी अंजली सिंह न्यू इअर पार्टीवरून घरी परतत असताना तिच्या स्कूटीवर मागे एक मुलगी बसली होती. जिचे नाव निधी असे आहे. कारने धडक देताच मृत तरुणी अंजली आणि तिची मैत्रीण निधी खाली कोसळली, मात्र स्कूटीवरून खाली पडताच अंजली कारच्या चाकात अडकली, कार अंजलीला फरपटत घेऊन जात असल्याचे पाहून तिची मैत्रीण बिथरली आणि ती घटनास्थळावरून घरी निघून गेली.

- Advertisement -

याबाबत मृत पीडितेची मैत्रीण निधीने मीडियाला सांगितले की, बलेनो कारने आमच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. यामुळे मी एक बाजूला पडले आणि अंजली समोरच्या बाजूला पडली, स्कूटीवरून खाली पडताच अंजली कारच्या चाकात अडकली. अंजली चाकाखाली अडकली हे कारमध्ये बसलेल्यांना माहित होते. यावेळी अंजली मदतीसाठी जोरजोरात ओरड होती, तरी ते थांबले नाहीत त्यांनी तिला कारने फरफटत नेले. ही संपूर्ण घटना पाहून मी बिथरले, आणि घाबरून मी घरी निघून गेले.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत एका २० वर्षीय तरुणीच्या स्कूटीला एका कार येऊन धडक दिली, ज्यामुळे स्कूटवरील संबंधित तरुणी खाली पडली. खाली पडताच तरुणी कारच्या चाकाखाली आली, यावेळी कार चालकाने गाडी न थांबवता यू- टर्न घेऊन तरुणीला फरफटत नेले, या निर्दयी घटनेत पीडित तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम २७९ (जोरात वाहन चालवणे) ३०४ ए ( निष्काळजीपणाने एखाद्याचा जीव घेणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक खन्ना ( २६), अमित खन्ना (२६), कृष्ण (२७), मिथुन (२६) आणि मनोज मित्तल अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.


हेही वाचा : राज्यातील वीज कर्मचारी संपावर, मात्र महावितरणची पर्यायी व्यवस्था सज्ज

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -