घरदेश-विदेशसीडीएस बिपीन रावत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

सीडीएस बिपीन रावत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Subscribe

अमित शहा, राजनाथ सिंह, अजित डोवाल यांनी घेतले अंत्यदर्शन * दोन्ही मुलींनी दिला मुखाग्नी,१७ गन फायरची सलामी * मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

तामिळनाडूमधील कुन्नरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेले भारताचे संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस )जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कृतिका आणि तारिणी या त्यांच्या मुलींनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी जनरल रावत यांच्या नातवांनीही अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली. त्यांना १७ ‘गन फायर’ची सलामी देण्यात आली. यावेळी देशातील दिग्गज राजकीय नेत्यांसह भारतीय संरक्षण दलातील ८०० वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंकाचे सैन्य दल प्रमुखांनी उपस्थिती लावली.

जनरल रावत आणि त्यांची पत्नी यांचे पार्थिव शुक्रवारी (१० डिसेंबर) सकाळी ११ वाजता त्यांच्या दिल्ली येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यानंतर त्यांचे नातेवाईक, मित्र, इतर सर्वांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांना आदरांजली वाहिली. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे, हरीश रावत, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि डीएमकेचे नेते ए. राजा आणि कनिमोई हे देखील या ठिकाणी उपस्थित होते.

- Advertisement -

‘अमर रहे.. अमर रहे.. जनरल अमर रहे’, ‘वंदे मातरम..’ ‘भारत माता की जय..’ ‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा..’ ‘बिपीनजी अमर रहे… अमर रहे, अमर रहे….’च्या घोषणा देत आज देशाच्या अस्सल हिरोला दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरही याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवाला त्यांच्या कन्येने मुखाग्नी दिला अन् देशाचा श्वास थांबला. हजारो डोळ्यांतून अश्रू ओघळले. एका पर्वाचा अस्त झाला.

शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. रावत यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यावर त्यांना 17 तोफांची सलामी देऊन गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर मंत्रोच्चारात लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांनी आपल्या मात्यापित्यांना मुखाग्नी दिला. कृतिका आणि तारिणी यांनी रावत आणि मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -