घरअर्थजगतभारताला पुन्हा धोक्याचा इशारा; काय म्हणाली जागतिक बॅंक...

भारताला पुन्हा धोक्याचा इशारा; काय म्हणाली जागतिक बॅंक…

Subscribe

 

नवी दिल्लीः भारताच्या जीडीपी दरात घसरण होणार असल्याचा इशारा जागतिक बॅंकेने दिला आहे. पुढील वर्षी भारताचा जीडीपी दर ६.६ असेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र यामध्ये घसरण होऊन जीडीपी दर ६.३ होईल, असे संकेत जागतिक बॅंकेने दिले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी भारतावर महागाईचे संकट असल्याची भीती व्यक्त होत आहे.

- Advertisement -

जागतिक बॅंकेने भारत विकासाची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यात २०२४ साली जीडीपी दरात घसरण होत असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. पुढील वर्षी विक्रीची गती मंदावेल. तसेच बाहेरील परिस्थितीचा परिणाम विकास दरावर होणार आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कर्ज महाग होणार असून त्याची वसुली मंदावणार आहे. महसुलावार त्याचा परिणाम होणार आहे. कोरोना काळात केलेल्या उपाय योजनांचाही अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. अमेरिका आणि युरोपमधील बॅंकांमध्ये झालेल्या घडामोडींचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत झालेल्या निर्यातीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली. मात्र विक्रीमध्ये झालेली घसरण जीडीपीला प्रभावित करणारी आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, कोरोना काळानंतर जगातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. अशातच 2023मध्ये इतर देशांबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेलाही सौम्य मंदीचा सामना करावा लागू शकतो. तथापि, इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) चांगल्या स्थितीत असेल. आर्थिक वर्ष 2023मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 6.8 टक्क्यांवरून 6.1 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्तविली असली तरी आयएमएफच्या नव्या यादीवर नजर टाकली तर इतर देशांच्या तुलनेत भारत आघाडीवर आहे.

आयएमएफच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकनुसार, जागतिक वृद्धीदर 2022मध्ये वर्तवलेल्या अंदाजे 3.4 टक्क्यांवरून 2023मध्ये 2.9 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर 2024मध्ये तो वाढून 3.1 टक्क्यांपर्यंत जाईल. 2023 मध्ये अमेरिकेचा (USA) विकास दर 1.4 टक्के असण्याची शक्यता आहे, तर ब्रिटनची (UK) अर्थव्यवस्था उणे 0.6 टक्का राहण्याचा अंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -